अमळनेर (जि. जळगाव) : ती शहरात हरवली...सोशल मीडियावर संदेश व्हायरल झाले आणि अखेर ती सापडली...पोटासाठी गल्लीबोळात टोपल्या विकत विकत एक महिला आपली अवघ्या सात वर्षांची पोटची मुलगी कुठे विसरली हेच त्या मातेला कळले नाही अन् ती बिथरली.
पोलिस ठाणे गाठले. लहान मुलगी असल्याने पोलिस संवेदनशील बनले. गल्लोगल्ली शोध घेतला अन् काही तासांत मुलगी सापडली. मुलीला पाहताच तिने मिठी मारली. आनंदाश्रू गाळत पोलिसांचे आभार मानायलाही विसरली नाही. (With help of vigilant police social media missing girl found Jalgaon News)
पारोळा येथील उंदिरखेडा रस्त्यावरील संगीता कचरू वाकोडे ही प्लास्टिक टब विक्री करून आपला उदरनिर्वाह करते. पोटासाठी ती आपल्या सात वर्षांची चिमुकली अंजली कचरू वाकोडे हिला घेऊन गावोगाव फिरत असते. ती शनिवारी (ता. १) अमळनेरच्या मुंदडानगर भागात टब विक्री करता करता मुलगी कुठे हरवली तिला उमगलेच नाही.ती पूर्णतः घाबरली होती.
मुलीला कोणी पळवून नेले की काय म्हणून भीती व्यक्त केली जात होती. आईने रडत पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांच्यासमोर व्यथा मांडली. शिंदे यांनी तातडीने पोलिस उपनिरीक्षक अनिल भुसारे, पोलिस कर्मचारी राहुल पाटील, शरीफ पठाण, अमोल पाटील, श्रीराम पाटील यांना वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केले.
हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?
महिला कोणत्या भागातून आली, याची माहिती घेत पोलिसांनी गल्लोगल्ली शोध घेतला. सामाजिक कार्यकर्ते तसेच इतर नागरिकांनी अमळनेरच्या विविध ग्रुपवर मुलगी हरवल्याचा संदेश व्हायरल केला.
सोशल मीडियाच्या मदतीने मुलगी एका नागरिकाला सापडली. घाबरलेल्या मुलीला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. मुलगी पोलिस ठाण्यात आणताच आईने मिठी मारली. तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आणि पोलिसांचे आभार मानून ती पुन्हा आपल्या व्यवसायाला निघून गेली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.