Beating esakal
जळगाव

Jalgaon Crime News : जामनेरला क्षुल्लक कारणावरून तरुणांसह महिलांना बेदम मारहाण; परिसरात तणावपूर्ण शांतता

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील श्रीराम पेठ भागात किरकोळ कारणावरून तरुणांसह महिलांना बेदम मारहाण केल्याने ११ जणांविरुद्ध रविवारी (ता. ९) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील श्रीरामपेठ भागातील तरुण व महिलांना किरकोळ कारणावरून जमावाने बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (ता. ९) दुपारी तीन चारच्या सुमारास घडली आहे. ( women and youth were brutally beaten in jamner jalgaon crime news )

त्यामुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण होते. वीज रोहित्रातील इंधन घेतल्याप्रकरणी ही मारहाण केल्याचे महिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

श्रीराम पेठ भागातील रोहीत्र दुरुस्तीचे काम सुरू असताना काही तरुणांनी त्यातील इंधन घेतले असता दुसऱ्या गटातील तरुणांनी मज्जाव केल्याने हा वाद उफाळून आला. वाद मिटतो न मिटतो, तोच काही वेळानंतर जमावाने तरुणांसह महिलांवर हल्ला चढविला. त्यात जितेंद्र कैलास कोळी (वय २३) व शुभम संजय लोणारी (वय २१) हे दोन जण मारहाणीत गंभीर जखमी झाले.

त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच आपल्या मुलांना होत असलेल्या मारहाणीतून वाचविण्यासाठी पुढे आलेल्या आशा कैलास कोळी व उषाबाई संजय लोणारी यांना सुद्धा ६० ते ७० जणांच्या जमावाने लाठ्या काठ्या व सोबतच दगडफेक करीत जीवघेणा हल्ला केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तसेच या टोळक्याने जातीवाचक शिवीगाळ करून तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशा धमक्या देत दोन्ही माता, पुत्रांना प्रचंड मारहाण केली, तसेच अंगावरील ४ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत हिसकावून घेतले असल्याचे फिर्यातदी म्हटले आहे. उषाबाई लोणारी यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या हल्ल्यातील प्रमुख तन्वीर मुनाफ शेख, समीर शेख लाला, रशीद खान, उजेब खान, सलिम शेख, जावेद रशीद, आवेश शेख, आदिल शेख, लालू शेख सिराज शेख, निसार पटेल, फिरोज लंबेडा उर्फ डॉक्टर या ११ संशयितांविरुद्ध जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या मारहाणीनंतर जामनेर पोलिसांनी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला. शहरात तणावपूर्ण शांतता असून, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: '...तर उद्धव येतोच कसा आडवा?', भोंग्यांवरून राज ठाकरेंनी सुनावलं, नेमकं काय म्हणाले?

Biotech IPO : 'ही' बायोटेक कंपनी आणणार 600 कोटीचा आयपीओ,अधिक जाणून घेऊयात...

Fact Check : इस्लामिक झेंडे फडकवत निघालेली बाईक रॅली अकोल्यातील काॅंग्रेस उमेदवाराच्या प्रचाराची नाही, व्हायरल दावा खोटा

'मुश्रीफ खूप प्रामाणिक नेता, त्यांना कोणतेही लेबल लावू नका'; शरद पवारांना उद्देशून काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

SCROLL FOR NEXT