jalgaon News esakal
जळगाव

Pink Rickshaw : महिला रिक्षाचालकांना थांबा द्यावा; गुलाबी रिक्षाचालक महिलांचे आयुक्तांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरात महिला गुलाबी रिक्षा चालवित आहेत. त्यांना स्वतंत्र थांबा देण्यात यावा, अशी मागणी रिक्षाचालक महिलांनी महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. (Women are driving pink rickshaw they should be given separate stop appeal to Municipal Commissioner jalgaon news)

निवेदनात म्हटले आहे, की शहरात गुलाबी रिक्षाचालक महिलांना पुरुष रिक्षाचालक प्रवासी घेऊ देत नाहीत. शहरात थांबे न दिल्याने त्यांना रिक्षा थांबविणेही कठीण होत आहे. जळगाव शहरात गरीब, होतकरू व बेरोजगार महिला व तरुणी या रिक्षांवर उदरनिर्वाह करीत असून, त्यांना पुरुष रिक्षाचालक ठिकठिकाणी प्रवासी घेऊ देत नाही.

अरेरावी, अश्लिल संभाषण करून या महिलांना अपमानास्पद वागणूक देतात. महिला रिक्षाचालक व मालकांनी जळगाव जनता बँकेकडून कर्ज काढून रिक्षा घेतल्या असून, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व मुलींच्या लग्नाची सर्वत्र जबाबदारी या महिलांवर आहे.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

त्यांना रिक्षाव्यवसाय करण्यास जाणून बुजून काही पुरुष रिक्षाचालक मानसिक त्रास देत आहेत, तसेच वाहतूक विभागाकडूनही त्यांना त्रास दिला जात असल्याने शासनाच्या ध्येयधोरणानुसार महिला सक्षमीकरण मोहीम राबवित असताना, रिक्षाचालक महिलांवर मात्र अन्याय होत आहे, म्हणून महिला रिक्षाचालकांना व्यवसायचे ठिकाण असलेले रेल्वेस्थानक, नवीन बसस्थानक व टॉवर चौक येथे थांबा मिळावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.

लहुजी बिग्रेडच्या अध्यक्षा आशा अंभोरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलिस अधीक्षक, महापालिका आयुक्त, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी चालक माधुरी भालेराव, माधुरी निळे, पोर्णिमा कोळी, पूनम गजरे, रंजना पवार, मालू सोनवणे, मनीषा सुरळकर, सरला पानपाटील, संगीता बारी, लिना सोनवणे उपस्थित होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Usha Vance: अमेरिकन पॉवर झोनमधून कमला यांची एक्झिट, उषा यांची एन्ट्री! भारताशी खास कनेक्शन अन् कोण आहेत? जाणून घ्या

Latest Marathi News Updates live : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी अजून एकाला अटक

Pakistan : पाकिस्तानची स्थिती ढासळली..! सरकारी शाळांतील शिक्षकांना आठ महिन्यांपासून पगार नाही?

Latur Assembly Election 2024 : लातूर विधानसभा यंदाच्‍या विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांवर उमेदवारांची मदार

Ranji Trophy 2024 : Shreyas Iyer, सिद्धेश लाडची सॉलिड सेंच्युरी, मुंबईचा संघ ३०० पार

SCROLL FOR NEXT