women helps Psychotic abandoned women jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon News : ‘नारीशक्ती’ने दिले बेवारस महिलेस जीवदान!

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : एमआयडीसी परिसरात लक्ष्मी पॉलिमरजवळ दहा दिवसांपूर्वी एक महिला झाडाझुडपात बेवारस अवस्थेत सापडली. रस्त्याने येणारे जाणारे तिच्याकडे पाहून निघून जात होते. (women helps Psychotic abandoned women jalgaon news)

जवळच राहणाऱ्या नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या सदस्य वंदना मंडावरे यांना ते दिसले. त्यांनी दोन-तीन जणांच्या मदतीने त्या महिलेस आपल्या शेडमध्ये निवारा दिला. अशा अवस्थेत कुठे ठेवायचे म्हणून त्यांनी नारीशक्ती अध्यक्ष मनीषा पाटील यांना फोन करून सर्व हकीकत सांगितली. क्षणाचाही विलंब न करता अध्यक्षा श्रीमती पाटील व पदाधिकारी लगेच महिलेला आधार देण्यास धावून आल्या.

तिची कोणत्याही प्रकारची ओळख पटत नव्हती. तिला नेण्यासाठी एकही रिक्षाचालक थांबत नव्हता. हीच लोकांची मानसिकता, इथेच माणुसकी संपली असे वाटत होते. त्याक्षणी आमदार सुरेश भोळे यांच्याशी नारीशक्तीच्या पदाधिकाऱ्यांनी संपर्क साधला असता त्यांनी ताबडतोब रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. तातडीने त्या महिलेस घेण्यासाठी रुग्णवाहिका हजर झाली. त्यानंतर तिला सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

तपासणी केली असता ती मनोरूग्ण असल्याचे आढळून आले. तिची ओळख मात्र पटत नव्हती. सिव्हीलमध्ये गेल्या आठ दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

आता तिची प्रकृती चांगली असून, तिच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याचा प्रश्‍न नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेपुढे उभा राहिला. महापौर जयश्री महाजन यांच्या सहकार्याने पाटील यांनी तिची रवानगी संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्र जळगाव येथे केली असून, तेथे तिला नेऊन तिची अंघोळ वगैरे घालून बेघर केंद्रात दाखल करण्यात आले.

या वेळी सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले. महापौर जयश्री महाजन, गायत्री पाटील, जानकी परदेशी, सकू राठोड, संजय परदेशी, करुणा मराठे, सुभाष राठोड, गौतम सपकाळ, पप्पू जगताप, रुग्णवाहिका चालक अशोक सपकाळे यांचेही सहकार्य मिळाले.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्राचे अध्यक्ष गणेश पाटील, व्यवस्थापक मनोज कुलकर्णी, लीगल ॲडव्हायझर वैशाली बोरसे, काळजीवाहक हर्षल वंजारी, राजेंद्र मराठे, शीतल काटे, आशा पाटील, गायत्री पाटील आदी या वेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT