अमळनेर (जि. जळगाव) : येथील ज्ञानवर्धिनी फाउंडेशन आणि दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व विकास बोर्ड (श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकार) क्षेत्रिय निदेशालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने येथील शंभर महिलांना डिजिटल साक्षरतेबाबत एकदिवसीय शिबिरात प्रशिक्षण देण्यात आले. (Women in Amalnera took digital literacy training jalgaon news)
टाउन हॉल येथे १८ जानेवारीला झालेल्या या शिबिरात दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व विकास बोर्ड, नाशिकच्या प्रभारी प्रादेशिक संचालिका सारिका डफरे या उपस्थित होत्या. जळगाव पीपल्स बॅँकेचे शाखा व्यवस्थापक रवींद्र पाटील यांच्याहस्ते कार्यक्रमाचे उद्धाटन करण्यात आले.
या वेळी सारिका डफरे यांनी कामगार महिलांना त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली. तसेच सध्याचा युगातील डिजिटल व आर्थिक साक्षरतेचे महत्त्व आदीबाबत माहिती दिली. अॅड. तिलोत्तमा पाटील यांनी महिलांच्या हक्क व अधिकार संदर्भातील विविध कायद्यांची ओळख सोप्या शब्दात करून दिली. जळगाव पीपल्स बॅँकेचे शाखा व्यवस्थापक रवींद्र पाटील यांनी महिलांना आर्थिक सक्षम होण्यासाठी समूह सहायता बचत गटाच्या भूमिकेचे महत्त्व विशद केले.
समारोपप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांनी आर्थिक सुरक्षितता तसेच डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन करून ऑनलाइन फ्रॉड होणार नाहीत, यासाठी मोबाइलवर आलेला ओटीपी कोणालाही सांगू नये, म्हणून आवाहन केले.
शेवटी राकेश जाधव यांच्याहस्ते लाभार्थी प्रशिक्षणार्थी महिलांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात आले. ज्ञानवर्धिनी फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी सूत्रसंचालन केले तर यशस्वितेसाठी भारती पाटील, जयश्री बारी आणि नम्रता जाधव यांचे सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.