जळगाव : दापोरा (ता. जळगाव) येथे दुचाकीचा धक्का लागल्याच्या संशयातून दोन्ही मुलांसह वृद्धेला बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. मारहाणीत जखमी प्रमिलाबाई सोनवणे यांचा मृत्यू (Death) ओढवला होता. तालुका पोलिस ठाण्यात याप्रकरणी चार संशयितांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा (homicide) गुन्हा दाखल झाला आहे. (women killed in mob violence Case filed against 4 Jalgaon Crime News)
तालुका पोलिसांत दाखल तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे, प्रमिलाबाई सोनवणे या दोन मुले व सुनांसोबत दापोरा येथे वास्तव्याला होत्या. बुधवारी (ता. १८) रोजी दापोरा गावात एका ठिकाणी लग्न होते. लग्नासाठी जळगाव येथील ज्ञानेश्वर प्रकाश मालचे हा त्याची कार क्रमाक (एमएच १९ डीवाय ४७१३) घेउन गावात आला होता. त्याला कोणीतरी अज्ञात दुचाकीस्वाराने कट मारल्याने संतापात त्याने प्रमिलाबाई सेानवणे यांचा मुलगा विजय याला जाब विचारत शिवीगाळ, मारहाण केली होती. मात्र, हा वाद मिटविण्यापूर्वीच वाढला.
सोनवणेंच्या घरावर हल्ला
अरूणनेच कारला कट मारल्याचा संशयातून अशोक नाईक, मंगलसिंग सोनवणे (दोन्ही रा. दापोरा, ता. जि. जळगाव), ज्ञानेश्वर मालचे (रा. जळगाव) आणि रमेश मोरे (रा. शिरसोली) अशांनी अरूणच्या घरावर चाल करुन येत अरुणसह त्याचा भाऊ विजय यास मारहाण करत असतानाच आई प्रमिलाबाई, विजयची पत्नी प्रियंका असे भांडण आवरण्यासाठी आले. मात्र, त्यांचा निभाव लागला नाही. तिघांना देखील मारहाण करण्यात आली. यात प्रमिलाबाई सोनवणे या ढकला-ढकलीत दगडावर फेकल्या गेल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असताना रविवारी (ता. २२) उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
मयत वृद्धेचा मुलगा विजय सोनवणे यांच्या तक्रारीवरून अशोक नाईक, मंगलसिंग सोनवणे (दोन्ही रा. दापोरा, ता. जि. जळगाव), ज्ञानेश्वर मालचे (रा. जळगाव) आणि रमेश मोरे (रा. शिरसोली) अशा चौघांविरुद्ध जळगाव तालुका पोलीसात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताचा शोध सुरु असून लवकरच त्यांना अटक करण्यात येणार असल्याने पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी संशयितांच्या शोधार्थ पथक रवाना केले असून गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश सायकर करीत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.