Vidrohi Sahitya Sammelan : स्त्रीवादाची मांडणी करणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका प्रतिमा परदेशी, स्त्रीवादी लेखिका संध्या नरे- पवार यांच्यासह तमन्ना इनामदार, प्रा. डॉ. वंदना महाजन, प्रा. डॉ. रेखा मेश्राम, कवयित्री प्रतिभा अहिरे, लक्ष्मी यादव, लढाऊ विद्यार्थी नेत्या निहारिका आणि साम्या.
सुप्रसिद्ध युवा रॅप आर्टिस्ट जी माही आदी ३ व ४ फेब्रुवारीला होणाऱ्या १८ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनासाठी येणार आहेत. (Women writers will be present for Amalner Vidrohi Sahitya Sammelan jalgaon news)
संमेलनातील सर्वोत्कृष्ट महिला साहित्यिकांच्या बौद्धिक मेजवानीचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विद्रोहीच्या संयोजकांनी केले आहे.
अमळनेर येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीत दोन दिवस होणाऱ्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या विविध मंडपात पार पडणाऱ्या बौद्धिक व वैचारिक चर्चांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखिकांना आमंत्रित करण्यात आले आहे.
सत्यशोधक स्त्रीवादाची मांडणी करणाऱ्या, विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष तथा पुणे येथील लेखिका प्रतिमा परदेशी, ‘सावित्रीबाई फुले आणि बेईमान लेखण्या’, ‘मला हवी असणारी पहाट’ यांसारख्या काव्यसंग्रहासह ‘सामाजिक परिप्रेक्ष्यातून स्त्रियांची आत्मकथने’.
‘साहित्याचे समाजशास्त्र’ यांसारख्या पंधरा ग्रंथांच्या लेखिका सुप्रसिद्ध कवयित्री प्रतिभा अहिरे, ‘तिची भाकरी कोणी चोरली’ या ग्रंथाच्या माध्यमातून बहुजन स्त्रीवादाची मांडणी करणाऱ्या अनेक नियतकालिकांतून महिलांच्या प्रश्नांवर अभ्यासपूर्ण मांडणी करणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका संध्या नरे-पवार, ‘स्त्री वाद आणि मराठी साहित्य’.
‘वादळवाट’च्या लेखिका मुंबई विद्यापीठातील प्रा. डॉ. वंदना महाजन, मुस्लिम महिलांच्या प्रश्नावर लेखन करणाऱ्या, ‘मुस्लिम बलुतेदार’ पुस्तकाच्या लेखिका, सत्यशोधक मंडळाच्या कार्यकर्त्या पुणे येथील तमन्ना इनामदार यांच्यासह खानदेशातील व स्थानिक इतर अनेक महिला लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या या संमेलनाच्या दोन दिवसातील विविध परिसंवादातून व गटचर्चातून आपली भूमिका मांडणार आहेत.
सुप्रसिद्ध रॅप आर्टिस्ट जी माही या संमेलनात आपल्या गीतांचे सादरीकरण करतील. विद्यार्थी संघटनेच्या नेत्या निहारिका आणि साम्या या शैक्षणिक धोरणावर आपले विचार मांडतील.
मराठी काव्य व गजल संमेलनात सुप्रसिद्ध कवयित्री लक्ष्मी यादव, सिल्किशा अहिरे, संगीता बडे, सविता घोडे, मीराताई इंगोले, पौर्णिमा मेश्राम, माधुरी वसंत शोभा, रोहिणी टाकळकर, अर्चना परदेशी, कल्पना पुसाटे यांसारख्या कवयित्री काव्य व गजल सादर करणार आहेत.
दरम्यान, विद्रोही मराठी साहित्य संमेलन समितीतर्फे ठिकठिकाणी महिलांच्या जागर बैठका घेऊन त्यांना उपस्थितीचे आवाहन केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.