जळगाव

Shadu Mati Workshop : शाडू मातीपासून गणपती मुर्ती बनविण्याची रविवारी कार्यशाळा; सकाळ -एनआयई आणि रोटरीचा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

Shadu Mati Workshop : ‘सकाळ-एनआयई’, रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाउनतर्फे येत्या रविवारी (ता. १०) शाडू मातीपासून गणेशमुर्ती बनविण्याची कार्यशाळा होणार आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये कलागूण विकसीत होण्याच्या उद्देशाने हा उपक्रम होणार आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात ‘सकाळ एनआयई’ व्यासपीठ सदैव प्रयत्नशिल असते. (Workshop on making Ganpati idol from Shadu clay on Sunday in jalgaon news)

त्याचाच एक भाग म्हणून रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाउन यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा, ओजस्वीनी कला महाविद्यालयात (एम. जे. कालेज) होणार आहे. सकाळी साडेनउला कार्यशाळा सुरू होईल.

एनआयई सभासदांसाठी मोफत कार्यशाळा असून, अन्य शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी सशूल्क आहे. इच्छूक विद्यार्थ्यांनी माहितीसाठी एनआयईच्या समन्वयीका हर्षदा नाईक-भट (मो. ८२७५५८८७९१) यांच्याशी संपर्क साधावा. कार्यशाळेत शाडूमाती आयोजकांकडून देण्यात येईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

विद्यार्थ्यांनी घरून येताना छोटा पुठ्ठा किंवा पाट, नॅपकिन, बाउल, कलर आणावेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाउनचे अध्यक्ष आर. एन. कुळकर्णी, मानद सचिव ॲड. किशोर पाटील, कार्यक्रम समिती प्रमुख शंकरलाल पटेल, उपाध्यक्षा छाया पाटील, ओजस्विनी कला महाविद्यालयाचे प्राचार्य मिलन भामरे यांनी केले आहे. दरम्यान, ‘सकाळ एनआयई’ची वार्षिक सभासद नोंदणी कार्यशाळेच्या ठिकाणी उपलब्ध असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : हेलिपॅडवर बॅग तपासणीसाठी कुणी पुढं आलं नाही, उद्धव ठाकरे म्हणाले- आज मला.....

Nashik Vidhan Sabha Election : कलम 370 वर काय, शेतकरी आत्महत्यांवर बोला; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे

Maharashtra Vidhan Sabha election 2024: पंधरा लाख मतदारांचं ऊसतोडणीसाठी स्थलांतर; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

Ajit Pawar : 'किंगमेकर' किंवा 'स्पॉयलर' होण्यात मला रस नाही, अजित पवार असं का म्हणाले?

Latest Maharashtra News Updates : आमदार डॉ. मनीषा कायंदे यांची हुसेन दलवाईंवर टीका

SCROLL FOR NEXT