World Banana Day celebration in jalgaon esakal
जळगाव

जागतिक केळी दिन : रोज दोन केळी खा... निरोग राहा..!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जैन इरिगेशन सिस्टिम्स व जैन फार्म फ्रेशतर्फे भाऊंच्या उद्यानाजवळ जागतिक केळी दिनानिमित्त कार्यक्रम झाला. केळीचे आरोग्यदृष्टीने असलेले महत्त्व यावर विशेष चर्चा झाली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ५०० किलो केळीचे वाटप करून रोज ‘दोन केळी खा आणि निरोगी राहा’ हा आरोग्याचा मंत्र या वेळी देण्यात आला.

केळीमध्ये सफरचंदापेक्षा पाचपट जास्त पोषणमूल्य

केळीतज्ज्ञ के. बी. पाटील, जळगाव केळी संशोधन केंद्रप्रमुख डॉ. संजीव पाटील, केळी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. गणेश देशमुख, जैन फार्म फ्रेश फूड्सचे किशोर रवाळे, सुदाम पाटील, एम. एन. महाजन, डॉ. विलास महाजन, सुरेश पाटील, दिनू चौधरी, सुनील लोढा, डॉ. प्रभाकर पाटील, डॉ. जे. आर. महाजन आदी उपस्थित होते.
डॉ. संजीव पाटील, डॉ. गणेश देशमुख यांच्या हस्ते केळीवाटपाचा प्रारंभ झाला. के. बी. पाटील यांनी केळीचे महत्त्व सांगितले. केळीमधील पोषक तत्त्वाचा विचार केल्यास सफरचंदापेक्षाही पाचपट जास्त पोषणमूल्य त्यात आहेत, असे त्यांनी सांगितले.

हे असतात घटक

केळीमध्ये पॉटेशियम, फॉस्फरस, आर्यन, व्हीटॅमन बी-६, कॅल्शिअम असते. श्रम करणाऱ्यांना तसेच खेळाडूंना स्फूर्ती देण्याचे काम केळी करते. कुपोषण दूर करण्यासाठीही केळी महत्त्वाची असून, त्याचे सेवन केले पाहिजे. विकसित देशांमध्ये ३० ते ३५ किलो दरडोई केळी खाल्ली जाते, तर भारतात १२ किलो प्रतिव्यक्ती केळी वर्षाला सेवन केली जाते, अशी माहितीही पाटील यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT