Paladhi (T.Jamner) whole family members including elders of Gore family. esaka
जळगाव

World Family Day: सालदारकीतून उभे केलेले कुटुंब बनले व्यावसायिक! पाळधीचा गोरे परिवार

शंकर भामेरे

घर असावे घरासारखे

नकोत नुसत्याच भिंती...

तिथे असावा प्रेम जिव्हाळा

नकोत नुसती नाती...’

World Family Day : कवयित्री विमल लिमये यांच्या या काव्यपंक्तींची आठवण यावी, असा कौटुंबिक आदर्श निर्माण केलाय, तो पाळधी (ता. जामनेर) येथील गोरे कुटुंबीयाने. तब्बल ३० जणांचे कुटुंब अनेक वर्षांपासून एकत्र राहते, एकत्रच स्वयंपाक बनतो अन्‌ सर्व सदस्य सोबतच भोजन करतात. परिणामी, ते केवळ जेवण न राहता एक भोजनयज्ञच होतो.

दुसऱ्यांच्या शेतावर सालदारी करून विहिरी खोदत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे गोरे कुटुंब आज उत्कर्षापर्यंत गेले असून, संपूर्ण राज्यभरातून त्यांच्या उत्पादनांना मोठी मागणी आहे. सालदारकी करणारे कुटुंब आज उद्योगजगतात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहे. (World Family Day family raised by Saldarkar became professional gore family of Paladhi jalgaon news)

कुटुंब नव्हे, संस्कार केंद्र

आजच स्पर्धेच्या युगात संयुक्त कुटुंब व्यवस्था धोक्यात आली आहे. मात्र, एकत्रित कुटुंब व्यवस्थेवर विश्वास ठेवत पाळधी येथील गोरे कुटुंब केवळ कुटुंब, म्हणून नाही तर एक ‘संस्कार केंद्र’, म्हणून नावारूपास आले आहे.

सालदारकीतून उभे केले कुटुंब

साधारण १९८० च्या दशकात पाळधी येथील (कै.) कडूबा उखर्डू गोरे यांनी दुसऱ्यांच्या शेतात विहिरी खोदून, तसेच सालदारकी करत आपल्या कुटुंबाला बळ दिले. लहान भावंडं प्रभाकर आणि भास्कर यांच्या कठोर परिश्रमातून गोरे कुटुंबीयांच्या प्रगतीचा सूर्योदय झाला.

प्रभाकर गोरे यांनी ट्रॅक्टर स्पेअर पार्ट्सचा व्यवसाय सुरू केला, तर भास्कर गोरे यांनी मळणी यंत्रांच्या मदतीने कुटुंबाला गती दिली.

गोरे कुटुंबाला ‘काळ्या’ कुटुंबाची संगत

‘काला हिरा’ म्हणजे म्हशी. मुळातच कष्ट उपसण्याची तयारी असलेल्या गोरे कुटुंबीयाने म्हशींचे संगोपन करून दुग्धव्यवसायात भरारी घेतली. आज त्यांच्याकडे ४० म्हशी असून, रोज २०० लिटर दूध पहूर येथे गोपाल डेअरी व पाळधी येथील शासकीय दूध डेअरीत विकले जाते.

म्हशींसाठी लागणारा हिरवा चारा शेतातच पिकविला जातो. गोपाल आणि प्रकाश दोघेही भावंडं गोठ्याची निगा घेतात. चारा नेण्यासाठी घरातील गृहिणी हातभार लावतात. गोरे कुटुंबासह म्हशींचे ‘काळं’ कुटुंबही इथे पाहायला मिळतं.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

फॅब्रिकेशन क्षेत्रात प्रगती

पारंपरिक व्यवसायासोबतच आधुनिकतेची कास धरत ‘गोरे इंजिनिअरिंग’ कंपनीच्या माध्यमातून नांगर, ट्रॉली, टीलर फवारणी यंत्र आदी शेती अवजारे बनविले जातात. सुनील आणि राजेंद्र ही भावंडं या कामात मदत करतात.

जळगाव जिल्ह्यासह मराठवाडा आणि विदर्भात त्यांनी पॉलिहाउस, जिनिंग शेड उभारणीची कामे केली असून, ३० हातांना रोजगार दिला आहे.

सबमर्सिबल पंप बुशिंग निर्मिती

केमिकल इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करून संदीप गोरे यांनी गुजरातमध्ये एक वर्ष खासगी कंपनीत काम केले. मात्र, त्यांच्यातील उद्योजक त्यांना स्वस्थ बसू देईना. ज्येष्ठ बंधू देवेंद्र यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणेने पाणबुडी सबमर्सिबल पंप बुशिंग तयार करण्याचा कारखाना त्यांनी सुरू केला.

तांबे, शिसे, जस्त, निकेल आदी मिश्र धातूंपासून तयार केलेल्या बुशिंगला संपूर्ण राज्यभरातून मोठी मागणी आहे. महिन्याकाठी त्यांचा ३० क्विंटल माल विकला जातो.

स्नेहभाव, विश्‍वासाचे नाते

‘कर्म हीच पूजा’ हा संत सावता महाराजांचा संदेश उराशी बाळगून (कै.) कडूबा गोरे यांच्या पावलावर पाऊल ठेवत आज गोरे कुटुंब वाटचाल करीत आहे. घरातील सर्व सदस्यांमध्ये परस्पर स्नेहभाव, सहकार्याची भावना तर आहेच;

पण त्याहीपलीकडे एक विश्वासाची भावना निर्माण झाली आहे. घरातील सर्व गृहिणी आपापली कामे प्रामाणिकपणे करतात. कुटुंबातील सुख-दुःखात सर्वच सहभागी होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT