World Honey Bee Day 2024 esakal
जळगाव

World Honey Bee Day 2024 : चुंचाळेत मोह फुलांच्या संपर्कातून मध तयार करण्याचा यशस्वी प्रयोग

ॲड. बाळकृष्ण पाटील

गणपूर (ता. चोपडा) : गेल्या काही वर्षांपासून मधमाशीच्या अस्तित्वाबाबत विविध स्तरावर वेगवेगळे निष्कर्ष पुढे आले असून, जागतिक दृष्ट्या मधमाशी जीवन धोक्यात आल्याचे दिसून आले आहे. जीवन विकासासाठी व सृष्टीवरील जीवनासाठी मधमाशीचे अस्तित्व गरजेचे असल्याचे अनेकांनी निष्कर्ष काढले आहेत. आज जागतिक मधमाशी दिन असून, मधमाशीच्या एका प्रयोगाविषयी. (World Honey Bee Day 2024 Experiment Chunchale)

मोह वृक्षांच्या बागेत ठेवलेल्या मधमाश्यांच्या पेट्या

मधमाशीच्या पेट्यांच्या माध्यमातून चुंचाळे (ता. चोपडा) येथे लागवड केलेल्या १२ एकरमधील ९०० मोह (महू) झाडांच्या सानिध्यात ठेवलेल्या मधमाश्यांच्या पेट्यांमध्ये मोह फुलांपासून मध गोळा करण्याचा यशस्वी प्रयोग केला जात आहे.

कृषी विभाग, आत्मा पुरस्कृत शेतकरी उदय बालमुकुंद महाजन व उद्यान पंडित अवधूत महाजन यांनी कर्जाने शिवारात गट क्रमांक १५० मध्ये काही वर्षांपूर्वी लावलेल्या मोह वृक्षांचा प्रयोग राज्यातील पथदर्शी असून, सद्यस्थितीत याच क्षेत्रात स्वतंत्ररित्या मोह फुलांपासून मध गोळा करण्यासाठी १५ मार्चपासून ते जून अखेरपर्यंत मधमाशांच्या २५ पेट्या ठेवण्यात आल्या आहेत आणि ‘मोहाच्या सानिध्यातून मध’ हा प्रयोग राबविण्यात येत आहे.

त्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी, वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख, प्रथमेश हळपे, वन परिक्षेत्र अधिकारी बी. के. थोरात, आरएफओ विकास सोनवणे, लासूरचे वनपाल सूर्यवंशी यांचे या प्रयोगासाठी मार्गदर्शन मिळत आहे. (latest marathi news)

मेलिफेरीया मधमाशी

या पेट्यांमध्ये मेलिफेरीया या मधमाशीचा प्रकार असून, त्याद्वारे हा स्वतंत्र प्रयोग केला जात आहे. विशेष म्हणजे मोह फुलांच्या सानिध्यात मधमाशांचे अस्तित्व आल्यामुळे मोह फुलांच्या परागीकरणात अमुलाग्र बदल दिसून आला असून, मोहाच्या झाडाला अधिक फुले येऊन झाडाला येणारे फळ म्हणजे टोळंबी अधिक लागल्याचे दिसून आले आहे.

टोळंबीच्या एका फळात तीन ते चार बिया असतात. त्याचे सालपटे काढून त्यातील बी सुकवून त्याचे तेल बनवतात. कच्च्या फळांपासून आदिवासी भागात भाजी बनविण्याचे ही प्रयोग झाले आहेत व मोह वृक्षांच्या बागेत असलेल्या मधमाशांच्या पेट्यांमुळे बाजूच्या क्षेत्रात घेतलेल्या भाजीपाला उत्पादनातही फरक जाणवल्याचे श्री. महाजन यांनी सांगितले.

त्यांनी मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षणही घेतले असून, त्याद्वारे संगोपन केले जात आहे. दोन ते तीन दशकांचा विचार करता खानदेशात कीटकनाशकांचा वापर वाढल्यामुळे मधमाशांचे प्रमाण कमी झाल्याचेही आढळून आले आहे. आपल्याकडे आढळणाऱ्या मधमाशांच्या प्रमाणात घट झाल्याचे जाणवते.

सातपुडा व पायथ्यावरच्या भागात मेलिफेरीया, सातेरी, आगे मोहोळ अशा जाती आढळतात. त्यात मेलीफेरीयाची राणी अंधारात राहते. याच भागात झाडाच्या ढोलीत कोते (कोथी) मधमाशी आढळते. ढोलीत असल्याने बरेच दिवस हे मध बाहेर काढले जात नसल्याने ते आंबट लागते, असा या क्षेत्रातील जाणकारांचा अनुभव आहे.

"मानवाच्या अस्तित्वासाठी व परागीकरणासाठी मधमाशीची नितांत गरज आहे. आदिवासी भागात त्याचे जतन झाल्यास अधिक मध मिळू शकेल आणि उदरनिर्वाहाचे साधन ही बनू शकेल." - दारासिंग पावरा, मध संकलक, गवऱ्यापाडा (ता. चोपडा)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT