Arun Sonawane (deceased) Sonu Adhale (suspect in custody) esakal
जळगाव

Jalgaon Crime News : अरुणचा गळा चिरत सर्वांगावर चॉपरने वार; संशयित अढाळेला घेतले ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील समतानगर येथे रविवारी (ता. १०) जुन्या वादातून अरुण बळिराम सोनवणे (२८, रा. समतानगर, जळगाव) या तरुणाचा खून करण्यात आला.

मारामारीवेळी हल्लेखोर दोध्या ऊर्फ पिंट्या शिरसाठ याचा पुतणीशी होणाऱ्या विवाहाला विरोध असल्याने समेट घडवण्यासाठी आलेल्या अरुणच्या डोक्यात लोखंडी असारीने पहिला हल्ला करताच, इतर संशयित तुटून पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले.(young man was killed due to an old dispute jalgaon crime news)

गुन्ह्यातील प्रमुख संशयिताला गुन्हे शाखेने विसरवाडीतून ताब्यात घेतले असून पथक सोमवारी (ता. ११) रात्री जळगावकडे रवाना झाले आहे. वर्चस्वाच्या खुन्नसमधून अरुणचा गळा चिरल्यावर सर्वांगावर चॉपरने वार केल्याची बाब पोलिसांच्या तपासातून पुढे आली.

अरुणची नुकतीच, खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली होती. सोनू अढाळे याच्या टोळक्याची वाळू व्यवसायात आणि समतानगर परिसरात दादागिरी होती. अरुण जुमानत नसल्याने सोनू आणि त्याच्या टोळक्यामध्ये चीड होती. त्यातून सोनूच्या सोबतच्या मुलांशी अरुणचे किरकोळ वाद झाल्याने रविवारी दुपारी एकला मारामारी झाली.

रामानंदनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला. मात्र, प्रकरण पोलिस ठाण्याबाहेर मिटवून टाकू, अरुणला नमवण्याचा यापेक्षा दुसरा मार्ग नाही असे म्हणत त्याला सोनू व दोध्याने मोबाईलवर फोन करून वंजारी टेकडीवर बोलावून घेतले. त्यानंतर झालेल्या तीक्ष्ण हत्यारांच्या हल्ल्यात अरुणचा मृत्यू झाला.

आशिष व गोकूळ हे गंभीर जखमी झाले. जखमी गोकूळ बळिराम सोनवणे यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिसांत सोनू, पप्पू अढाळे, बळीराम चव्हाण, अशोक राठोड, दोध्या ऊर्फ पिंट्या शिरसाठ अशा पाच संशयितांची नावे समोर आली असून गुन्हे शाखेची चार पथके त्यांच्या मागावर आहेत.

दोध्याला अरुण चालेना

दोध्या याच्या सख्ख्या पुतणीसोबत अरुणची सोयरीक संबंध जुळले होते. या विवाहाला दोध्याचा सुरवातीपासून विरोध होता. २५ डिसेंबरच्या मुहूर्तावर अरुणचे त्याच्या पुतणीसोबत विवाह होणार होता.

रविवारच्या वादाचे समेट घडवण्यासाठी अरुणला वंजारी टेकडीवर बोलावल्यानंतर बोलणे सुरु असताना अरुण जुमानत नाही म्हटल्यावर दोध्याने त्याच्या हातातील लोखंडी रॉड अरुणच्या डोक्यात मारल्यावर इतरांनी हत्यार काढून त्याच्यावर हल्ला चढवला. अरुणचा गळा चिरून, मानेवर छाती, पोटात वार केल्याने तो जागीच ठार झाला.

जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक किशन पाटील यांनी वेगवेगळ्या दिशेने चार पथके मारेकऱ्यांच्या शोधासाठी रवाना केली होती. सुरतच्या दिशेने गेलेल्या पथकातील विजय पाटील यांच्यासह पथकाला सोनू अढाळे हा सुरतला पळून जात असताना विसरवाडी (जि. नंदुरबार) येथे थांबला असल्याची माहिती मिळाली होती.

त्याला पोलिस पथकाने विसरवाडी येथून ताब्यात घेतले असून रात्री पथक जळगावच्या दिशेने रवाना झाले आहे. इतर संशयितांच्या शोधासाठी तांत्रिक तपास आणि उपलब्ध माहितीच्या आधारे शोध सुरु असल्याचे निरीक्षक पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT