Railway Accident Death News esakal
जळगाव

अंधार अन्‌ हेडफोनने तरुणीचा घात!; भरधाव रेल्वेची जबर धडक

रईस शेख

जळगाव : कामावरून घरी परतत असताना कानात हेडफोन (Headphone) लावून रेल्वेरूळ ओलांडणाऱ्या तरुणीला रेल्वेची (railway) जबर धडक लागल्याने तिचा जागीच मृत्यू (Death) झाला. शिवाजीनगरजवळ उभारल्या जाणाऱ्या उड्डाणपूलाजवळच ही घटना घडली असून स्नेहल वैभव उज्जैनकर (वय १९, रा. धनाजी काळेनगर, जळगाव) असे मयत तरुणीचे नाव आहे. (young woman was killed by railway while railway crossing Jalgaon News)

लोहमार्ग पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहल उज्जैनकर ही तरुणी आईवडिलांसह शिवाजीनगर परिसरातील धनाजी काळेनगरात वास्तव्याला आहे. स्नेहल शहरातील एका कॉस्मेटिक दुकानावर कामाला होती. नेहमीप्रमाणे सोमवारी (ता. २३) रात्री ८.३० वाजता काम संपल्यावर स्नेहल कामावरून घरी पायी जाण्यासाठी निघाली होती. शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरु असल्याने शॉटकर्ट म्हणून परिसरातील रहिवासी रेल्वेरुळ ओलांडून ये-जा करतात, स्नेहलही नेहमीप्रमाणे घराकडे जाण्यासाठी तहसिल कचेरीकडून जात असताना रेल्वे रुळावर आली. मात्र, उजव्या बाजूने भुसावळकडून येणाऱ्या सुरत-भुसावळ पॅसेंजरने तिला धडक दिली. या अपघातात शितलचा जागीच मृत्यू झाला. मोटरमनकडून स्टेशन मास्टरला वायरलेस संदेश प्राप्त झाल्यावर त्यांनी तत्काळ लोहमार्ग पोलिसांना घटनास्थळी रवाना केले. लोहमार्ग पोलिसांनी मयत तरुणीचा मृतदेह उचलून जिल्‍हा सामान्य रुग्णालयात रवाना केला.

अंधार अन्‌ हेडफोनमुळे घात

लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरु असून शिवाजीनगरवासिय रेल्वेरुळ ओलांडून ये-जा करत असतात. मात्र, कधी-कधी या रस्त्यावर अंधारही असतो. स्टेशनजवळ असल्याने रेल्वेगाड्यांची ये-जा सुरु असते परिणामी हॉर्नही वाजतच असल्याने नागरिकांना याची सवय झाली आहे. स्नेहल देखील नेहमीची ये-जा करीत असल्याने रेल्वेरुळ ओलांडताना बिनधास्त असावी त्यातच अचानक सुरत पॅसेंजर आल्याने तिला काही समजण्याच्या आत घात झाला. मयत तरुणीच्या कानात हेडफोन लावलेले आढळून आले. याप्रकरणी जळगाव लोहमार्ग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास लोहमार्ग पोलिस कर्मचारी सचिनकुमार भावसार आणि किशोर पाटील करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT