A sword recovered from the youth 
जळगाव

Jalgaon Crime News : तलवार बाळगल्याप्रकरणी टहाकळीच्या तरुणास अटक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : येथून जवळच असलेल्या टहाकळी गावात एका तरुणाने घरात तलवार लपविली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यावरून संशयिताच्या घराची झडती घेतली असता तलवार आढळून आल्याने पोलिसांनी संशयितासह तलवारीसह ताब्यात घेतले. (Youth arrested for possession of sword jalgaon crime news)

वरणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिषकुमार आडसूळ यांना सोमवारी (ता.२) गुप्त माहिती मिळाली की टहाकळी येथील आकाश प्रल्हाद सोनवणे (वय २३) याच्याकडे तलवार आहे. त्याने सोशल मीडियावर तलवारसोबत फोटो देखील शेअर केले आहे.

त्या अनुषंगाने सहाय्यक पोलिस निरीक्षक आडसूळ, पोलिस उपनिरीक्षक परशुराम दळवी यांनी सोमवारी(ता. २) दुपारी संशयित आकाश सोनवणे याच्या घराची झडती घेतली असता दोन हजार रुपये किमतीची दोन फूट लांब लोखंड धातूची पितळी मूठ व दीड इंच रुंद पाते असलेली तलवार आढळून आली.

पोलिसांनी शस्त्र जप्त करून संशयित आकाश सोनवणे याने गावात दहशत निर्माण करण्याच्या इराद्याने अवैधरीत्या घरात तलवार बाळगल्याप्रकरणी त्याला अटक केली.

पोलिस कर्मचारी योगेश पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास आशिषकुमार आडसुळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी नावेद अली करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

में यूपी से हू; मराठी नही आती...! मुंबई मेट्रोवनमधील कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल, मराठी एकीकरण समितीकडून करेक्ट कार्यक्रम

Ranji Trophy 2024: साई सुदर्शनचे द्विशतक, Ishan kishan चे शतक, तर वॉशिंग्टन सुंदरची तुफान फटकेबाजी

आणि त्याने लगेच पाण्यात उडी मारली... 'राजा राणी'च्या सेटवर सुरज चव्हाणने वाचवला एकाचा जीव

Worli Assembly Constituency: वरळीत तिरंगी लढतीची शक्यता, आदित्य ठाकरेंचं टेन्शन वाढणार!

Latest Maharashtra News Updates : सायन-पनवेल उड्डाणपुलाखाली उभारणार स्वच्छतागृहे

SCROLL FOR NEXT