youth molested minor girl jalgaon crime news esakal
जळगाव

Jalgaon Crime News : माझ्यासोबत लग्न कर; नकार दिला तर... म्हणत युवकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : माझ्यासोबत चल, आपण लग्न करू. नकार दिला तर तुझ्या अंगावर ॲसिड टाकेन, अशी धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या युवकास पीडित मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणी पोलिसांनी युवकास अटक केली आहे. (youth molested minor girl jalgaon crime news)

सलीम पिंजारी असे अटक केलेल्या युवकाचे नाव असून, तो शहरातील १४ वर्षीय विद्यार्थिनीचा ती शाळेत ये-जा करताना सतत पाठलाग करत असे. एकांत साधून प्रेमाची मागणी घालत होता.

गेल्या दोन दिवसांपूर्वी विद्यार्थिनीला एकांतात गाठत माझ्यासोबत चल, आपण लग्न करू, नाही तर तुझ्या अंगावर ॲसिड टाकेन, अशी धमकी देऊन संशयिताने लज्जास्पद वर्तन केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामुळे अल्पवयीन विद्यार्थिनी प्रचंड घाबरली. तिने झाला प्रकार वडिलांना सांगितल्यानंतर पीडितेच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली.

त्या आधारे पोलिसांनी पॉस्कोॲट्रॉसिटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करून सलीम पिंजारी यास अटक केली आहे. उपअधीक्षक धनंजय येरूळे, पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी मनोहर नाईक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT