crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : गोविंदा रिक्षास्टॉप चौकात तरुणाच्या पोटात खुपसला चॉपर

शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉपजवळील एक्सिस बँके जवळील डिपी जवळ मंगळवारी (ता.१६) अकरा वाजेच्या सुमारास एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करुन जखमी करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉपजवळील एक्सिस बँके जवळील डिपी जवळ मंगळवारी (ता.१६) अकरा वाजेच्या सुमारास एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करुन जखमी करण्यात आले.

येसाजी हेमराज चव्हाण (वय-३६ रा.बालाजीपेठ, मारवाडी व्यायाम शाळेजवळ) असे जखमीचे नाव असून दोन गटात झालेल्या झोंबाझोंबीनंतर या ठिकाणी चौकात दगडफेकही झाली. (youth was attacked with sharp weapon and injured jalgaon crime news)

हल्लेखोर दुचाकीने पसार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी माहिती देताना सांगितले. प्रत्यक्षदर्शीं सांगितलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील मध्यवर्ती खान्देश सेंट्रलच्या रेल्वेस्थानक रोडकडून रात्री अकरा वाजेच्या सुमारास एक तरुण गोविंदा रिक्षास्टॉपच्या दिशेने पळत आला.

ॲक्सिस बँकेच्या दिशेने पळत आला. त्याच्या मागे दोन मोटारसायकलींवर आलेल्या तीन-चार तरुणांनी त्याला चौकातच पटेल प्लाझा कॉम्प्लेक्स जवळ धरले. झटापट होवून भांडण करतच हल्लेखोरांनी त्याला ॲक्सिस बँकेजवळ ओट्यावर धरले आणि चॉपरने सपासप वार करण्यास सुरवात केली. मात्र, यावेळी जखमी तरुणाच्या मित्रांनी दगडफेक सुरु केली.

दोन्ही दिशने दगडफेक होऊन हल्लेखोर दोन दुचाकीवर बसून पसार झाले. जखमी तरुणाला लगेच उचलून रुग्णालयात नेण्यात आले.

घटनेची माहिती कळताच पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत, गुन्हेशाखेचे निरीक्षक किशन नजन पाटील, आर.टी. धारबळे अशांसह गुन्हेशोध पथकाचा फौजफाटा घटनास्थळावर दाखल झाला.

संशयितास अटक

जखमी येसाजी हेमराज चव्हाण याने दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, रात्री पावणे अकरा वाजता येसाजी व त्याचा मित्र रोहन कुरकुरे असे दोघेही पायी फिरत होते.

त्याच वेळी भगवान सोनवणे याचा फोन आला व त्याने तिकडून विनाकारण शिवीगाळ करण्यास सुरवात केली. शिवीगाळ का करतोय हे विचारल्यावर त्याने चौकातील डिपीजवळ असल्याचे सांगितले.

तेथे गेल्यावर भगवान सोनवणे याने धक्काबुकी करुन त्याच्या सोबतच्या इतर दोघांनी धक्काबुक्की करत एकाने चॉपर काढून पोटात खुपसला.

जखमी अवस्थेत रोहन कुरकूरे व तानाजी चव्हाण अशांनी येसाजी यास डॉ.भंगाळे यांच्या रुग्णालयात दाखल केल्याचे जखमीच्या जबाबानुसार शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

पहाटेपर्यंत शहर पोलिस आणि गुन्हेशाखेच्या पथकाने संशयीत भगवान सोनवणे याला शिवाजीनगर येथून ताब्यात घेतले.

त्याचे साथीदार मात्र फरार होण्यात यशस्वी ठरले. संशयीताला आज मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर केले असता पाच दिवस पोलिस कोठडीत रवाना करण्यात आले आहे.

तपास उपनिरीक्षक क्षीरसागर करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogendra Yadav: हरियानाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काय होणार? योगेंद्र यादव यांनी केलं भाकीत

Farmers Protest: दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन; उपोषणाची घोषणा! दिल्लीच्या दिशेने ट्रॅक्टर्स होणार रवाना

पाकिस्तान क्रिकेटची 'सर्कस'! Champions Trophy 2025 साठी निवडला नवा प्रभारी कोच; जेसन गिलेस्पी आता फक्त...

Winter Kitchen Cleaning Tips: किचन हे आरोग्याचे अन् रोगाचे माहेरघर! हिवाळ्यात अशा प्रकारे स्वयंपाकघराची ठेवा स्वच्छता

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT