जळगाव

Jalgaon Yuvarang Festival : 7 ते 11 दरम्यान रंगणार युवारंग; खानदेशातील 111 महाविद्यालयांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Yuvarang Festival : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आयोजित युवारंग २०२३ महोत्सव यंदा केसीई सोसायटीच्या मु. जे. महाविद्यालयाच्या कान्ह कलानगरीत आयोजित करण्यात आला आहे.

यंदाच्या महोत्सवात जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील १११ महाविद्यालयांतील विद्यार्थी आपली कला सादर करण्यासाठी सहभागी होत असल्याची माहिती विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे प्रा. जयेंद्र लेकुरवाडे व प्राचार्य स. ना. भारंबे यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Yuvarang Festival from 7 to 11 oct in jalgaon news)

मु. जे. महाविद्यालयाच्या कॉन्‍फरन्‍स हॉलमध्‍ये आयोजित पत्रपरिषदेस केसीईचे प्रवीणचंद्र जंगले, सांस्‍कृतिक समन्‍वयक शशिकांत वडोदकर, युवारंग समन्‍वयक डॉ. जुगलकिशोर दुबे, सहसमन्‍वयक डॉ. मनोज महाजन, विद्यापीठाच्‍या व्‍यवस्‍थापन समिती सदस्‍या पवित्रा पाटील उपस्थित होते.

विद्यापीठाचा‍ युवारंग महोत्‍सव ७ ते ११ या कालावधीत महाविद्यालयाच्‍या आवारात होत आहे. यात शनिवारी (ता. ७) दुपारी चारला सांस्‍कृतिक पथसंचलन मु. जे. महाविद्यालयाच्‍या गेटपासून शिवतीर्थ मैदानापर्यंत काढले जाणार आहे.

महोत्‍सवाचा उद्‍घाटन सोहळा रविवारी (ता. ८) सकाळी दहाला रंगमंच क्रमांक १ वर उच्‍च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. विजय माहेश्‍वरी यांच्‍या हस्‍ते होईल. या वेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, जैन इरिगेशनचे अध्‍यक्ष अशोक जैन, आयोजन समितीचे अध्‍यक्ष तथा संस्‍थेचे अध्‍यक्ष नंदकुमार बेंडाळे यांची प्रमुख उपस्थिती असेल.

स्‍वराज्‍य स्‍थापनेची थीम, पाच रंगमंचांवर उत्सव

यंदा शिवराज्‍याभिषेक सोहळ्याचे ३५० वे वर्ष साजरे करत असल्‍याने युवारंगात यंदा स्‍वराज्‍य स्‍थापनेची थीम ठेवण्यात आली आहे. त्‍यानुसार मुख्‍य प्रवेशद्वारासह प्रत्‍येक रंगमंचाच्‍या प्रवेशद्वारावर तसे गेट तयार केले जाणार आहे. तसेच महोत्‍सवात होणारे विविध कलाप्रकार सादरीकरणासाठी पाच रंगमंच असतील. यात रंगमंच १- कवयित्री बहिणाबाई चौधरी रंगमंच, ना. धों. महानोर रंगमंच-२, पूज्‍य साने गुरुजी रंगमंच-३, भारतरत्‍न लता मंगेशकर रंगमंच-४ व कलामहर्षी केकी मूस रंगमंच क्रमांक- ५ असे नावे दिली आहेत.

बक्षीस वितरणाला सुरभी हांडे

पाचदिवसीय युवारंग महोत्‍सवाच्‍या कार्यक्रमाचा समारोप आणि बक्षीस वितरण ११ ऑक्टोबरला होईल. या कार्यक्रमाला पारितोषिक वितरण सुप्रसिद्ध सिनेकलाकार जय मल्हार फेम सुरभी हांडे यांची प्रमुख उपस्थिती असेल. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एस. टी. इंगळे अध्यक्षस्‍थानी असतील.

प्रत्‍येक रंगमंचासाठी बारकोड

युवारंग महोत्‍सवात सादरीकरण होत असलेल्‍या प्रत्‍येक रंगमंचासाठी यंदा बारकोड देण्यात आलेला आहे. हा बारकोड स्‍कॅन करून दिवसभरातील सादर झालेले कार्यक्रम त्‍यावर पाहता येणार आहेत. शिवाय प्रत्‍येक कार्यक्रमाचे यूट्यूबवरून लाइव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'ही' नक्कल केल्यामुळे महाराष्ट्रात भाजपचा विजय झाला; कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमारांनी सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर सुनील तटकरे देवगिरीवर दाखल

MLA Hemant Rasne : कसबा विधानसभा नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने कचरा, कोंडीमुक्त मतदारसंघासाठी प्रयत्न

Islampur Results : जयंतराव-निशिकांत पाटलांमध्ये गावागावांत टक्कर; अनेक गावांत जयंतरावांना धक्‍का, कोणाला किती पडली मतं?

Crime News: स्मशानातील लाकडांवर रक्ताचे डाग; दोघांनी मिळून केला होता खून, पोलिसांनी 'असा' लावला छडा

SCROLL FOR NEXT