जळगाव

Jalgaon Yuvarang Festival : मातीतून साकारली आई, ‘वेस्टर्न’वर रॉक करणारी तरुणाई! युवारंगचा जल्लोष शिखरावर

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Yuvarang Festival : एकीकडे मातीकलेतून वात्सल्याचे प्रतीक असलेली आई साकारणारी आणि त्याचवेळी ‘वक्का वक्का...’ असे पाश्‍चिमात्य गाणे गात सभागृहात सर्वांना थिरकायला भाग पाडणारी तरुणाई.

तर दुसरीकडे भारताच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रभावावर परखड मते मांडणारी आणि प्रहसनाद्वारे विनोद निर्मिती करत अंतर्मुख करणारी तरुणाई, अशी तरुणाईची कितीतरी रूपे युवारंग युवक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मुळजी जेठा महाविद्यालयाच्या प्रांगणात अनुभवायला मिळाली.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि केसीई संस्थेचे मुळजी जेठा महाविद्यालय यांच्यातर्फे रविवार (ता. ८)पासून आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवास प्रारंभ झाला आहे. महोत्सवाचा सोमवारी (ता. ९) दुसरा दिवसही कलावंतांनी गाजविला. (yuvarang festival second day celebrated in jalgaon news)

लक्षवेधी ठरली ‘कोलाज’ कला

सोमवारची सकाळ रंगमंच क्रमांक ५ वरील कलामहर्षी केकी मूस सभागृहात ‘कोलाज’ या कला प्रकाराने सुरू झाली. या स्पर्धेत ४८ स्पर्धकांनी भाग घेतला. फ्लॉवरपॉट, सफरचंद व एखादे फळ, असा विषय परीक्षकांनी दिला होता.

कोलाजद्वारे स्पर्धकांनी हुबेहुब फ्लॉवरपॉटचे दर्शन घडविले. मेंदी या कला प्रकारात ८४ जणांनी भाग घेतला. स्पर्धकांनी आपल्या सोबत्यांच्या पूर्ण हातभर मेंदी रेखाटल्या. मुळात मेंदीची प्रकृती थंड असल्यामुळे शरीराचे तापमान योग्य ते राखून शरीरात थंडावा देत असते. पूर्ण हातभर मेंदी काढल्यामुळे ऑक्टोबर हीटमध्ये ही मेंदी काहीशी थंडावा देऊन गेली.

मातीकलेतून अनोखा आविष्कार

सभागृहात दुपारी मातीकला या कला प्रकारातील स्पर्धेसाठी आई व मूल आणि संगीत हे दोन विषय देण्यात आले होते. एकूण ३६ विद्यार्थ्यांनी यात भाग घेत अडीच तासात मातीकलेतून मातृत्वाचा सुंदर आविष्कार घडविला.

मूल आणि आई यांच्यातील तरल नाते मूर्तीकलेतून जिवंत झालेले दिसून आले. काही स्पर्धकांनी संगीत वाद्य साकारले. याच सभागृहात स्थळ छायाचित्रण स्पर्धेत ४६ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. त्यांनी कल्पकतेला वाव देत सुंदर, अप्रतिम अशा स्थळ छायाचित्रणाचे सादरीकरण करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

मातीपासून मूर्ती बनवताना. व कुंचल्याद्वारे चित्रकलेचा आविष्कार साकारताना तरुणी.

‘वेस्टर्न म्युझिक’ची भुरळ

रंगमंच क्रमांक २ ना. धों. महानोर सभागृहात पाश्‍चिमात्य समूह गीतगायन स्पर्धा झाली. सर्वाधिक लोकप्रिय असलेले ब्राझीलचे ‘वक्का वक्का’, ‘माय लव माय हार्ट’, ‘सी यू अगेन’ आदी श्रवणीय समूहगीत सादर करताना या गीतांवर प्रेक्षकांनाही ठेका धरायला लावला. पाश्चात्त्य वेशभूषा, केशभूषा, देहबोली हे सर्वकाही भारावून टाकणारे होते.

रंगमंच क्रमांक ४ भारतरत्न लता मंगेशकर रंगमंचावर पाश्‍चिमात्य गायन स्पर्धेत १२ स्पर्धकांनी भाग घेतला. त्यानंतर दुपारच्या सत्रात पाश्‍चिमात्य वादन स्पर्धेत आठ स्पर्धकांनी भाग घेतला. गिटार, ड्रमसेट, की-बोर्ड, व्हायोलिन आदी वाद्य तन्मयतेने वाजविली.

विविध विषयांची हाताळणी

रंगमंच क्रमांक १ कवयित्री बहिणाबाई चौधरी खुल्या रंगमंचावर दिवसभर प्रहसनाद्वारे प्रेक्षकांना विविध विषयांवर विचार करायला स्पर्धकांनी भाग पाडले. विविध क्लृप्त्या योजून हास्य निर्माण करणारे प्रहसन रसिकांना अंतर्मुख करीत होते. मणिपूर प्रकरण आणि महिलांवरील अत्याचार, सत्य-असत्याचा शोध, सोशल मीडियाचे दुष्परिणाम, वाहतुकीचे नियम, राजकारण, शाकाहार आदी विविध विषय हाताळून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सादरीकरण केले. या स्पर्धेत १९ संघांनी भाग घेतला.

वादविवाद स्पर्धेतून विषयांची मांडणी

रंगमंच क्रमांक ३ पूज्य साने गुरुजी रंगमंचावर वादविवाद स्पर्धा रंगली. आंतरराष्ट्रीय पटलावर भारताचा प्रभाव आहे/नाही हा विषय स्पर्धेसाठी होता. समर्थन व विरोधात मते मांडतांना विद्यार्थ्यांचे वाचन, बौद्धिक प्रगल्भता आणि चौफेर अभ्यास दिसून आला.

अत्यंत पोटतिडकीने विषयाच्या अनुकूल बाजूने मत मांडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मताचे खंडन प्रतिकूल बाजू मांडताना त्याच पद्धतीने केले जात होते. या स्पर्धेत ५९ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

कडक उन्हातही उत्साह कायम

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी उन्हाचा तडाखा बसत असतानाही स्पर्धकांमध्ये चैतन्यदायी उत्साह होता. भोजन व निवासव्यवस्था उत्तम असल्याने स्पर्धक संयोजनावर समाधानी होते. युवारंगाचे कार्याध्यक्ष व व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, युवारंगाचे स्वागताध्यक्ष व केसीई संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. सुरेखा पालवे, नितीन झाल्टे, डॉ. पवित्रा पाटील यांनी विद्यार्थी व्यवस्थेच्या ठिकाणी व विविध रंगमंचास भेट दिली. या वेळी अधिसभा सदस्य दीपक पाटील, डॉ. मंदा गावित, प्रा. जयंत मगर, प्रा. दिनेश चव्हाण, प्राचार्य संजय भारंबे व विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा. जयेंद्र लेकूरवाळे, डॉ. जुगलकिशोर दुबे, डॉ. मनोज महाजन, डॉ. विजय लोहार उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT