Women Harassment esakal
जळगाव

Women Harassment : तोतया Anticorruption Officer अन्‌ बोगस पत्रकाराचे प्रताप

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : तोतया लाचलुचपत विभाग अधिकारी आणि बोगस क्राईम रिपोर्टरने जिल्हा परिषदेत कंत्राटी कामगार महिलेकडून ४५ हजारांची खंडणी उकळली. इतक्यावरच न थांबता या दोघांनी पीडिताकडे शरीरसुखाची मागणी केल्याने पीडिताने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.

यानंतर दोघांचे बिंग फुटले असून ते तोतया असल्याचे उघड झाले. जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दोनच दिवसांपूर्वी एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने डॉक्टरकडून खंडणी उकळल्याचा गुन्हा दाखल झाला असताना लगेच दुसरे प्रकरण समोर आले आहे.(ZP contract lady ransom of 45 thousand paid Women Harassment By anticorruption Officer and bogus crime reporter Jalgaon Crime News)

जळगाव शहरात जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेली चाळीस वर्षीय विवाहिता जिल्हा परिषदेच्या एका पंचायत समिती कार्यालयात कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत आहे. ७ ते १५ ऑक्टोबर दरम्यान महेंद्र सोनवणे (रा. खर्दे, ता. धरणगाव), कथित क्राईम इन्व्हेस्टीगेशन न्यूज रिपोर्टर राजेंद्र निकम (रा. वाघनगर जळगाव) यांच्यासह एक अनोळखी अशा तिघांनी या विवाहितेला पंचायत समिती कार्यालयात येऊन आपण लाचलुचपत प्रतिबंध खात्याचे अधिकारी असल्याचा धाक दाखवत कट रचला.

महिलेच्या हातात १ हजार रुपयांची रक्कम ठेवून व्हिडिओ बनविला. हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी दिली अन तसे न करण्यासाठी या महिलेकडून ४५ हजाराची खंडणी वसूल केली.

तिच्याशी अंगलट करून शरीरसुखाची मागणी करत विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर विवाहितेने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात काल (ता.१५) रात्री उशिरा महेंद्र सोनवणे (पुर्ण नाव माहिती नाही, रा. खर्दे, ता. धरणगाव, राजेंद्र निकम (पूर्ण नाव माहित नाही, रा. वाघनगर, जळगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर तपास करीत आहेत.

बोगस पत्रकारांचा सुळसुळाट..

जळगाव शहरात बोगस मोबाईलछाप पत्रकारांचा सुळसुळाट झाला असून शहरातील एका डेअरी चालकाला फुडॲण्ड ड्रग्ज्‌वाले असल्याचे सांगत १ लाखांची खंडणी मागण्यात आली. असाच प्रकार शहरातील एका प्रसिद्ध पान दुकानचालकाबाबत घडला. मोबाईलमध्ये कसला तरी व्हिडिओ तयार करून ही मंडळी ब्लॅकमेल करत असल्याचे प्रकार सुरू असून मोठ्या प्रमाणावर खंडणी वसुलीच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यासाठी बारीक कटींगसह धडधाकट दिसणारा कोणीतरी ॲण्टीकरप्शन अधिकारी बनतो, तर कुणी फुड ॲण्ड ड्रग्ज्‌चा अधिकारी होतो. जोडीला बोगस पोर्टलछाप पत्रकाराला घेऊन छापेमारीचा आव आणत खंडणी उकळली जात असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT