ongc recruitment 2021 apply for 309 post last date for online application form is 1 November  Google
Jobs

ONGC मध्ये 309 पदांची भरती; उद्यापर्यंत करता येईल ऑनलाईन अर्ज

सकाळ डिजिटल टीम

ONGC recruitment 2021 : ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC) मध्ये पदवीधर प्रशिक्षणार्थी पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. याअंतर्गत एकूण 309 पदांची भरती केली जाणार आहे. तरी इच्छुक या पदासाठी ऑनलाईन अधिकृत वेबसाइट www.ongcindia.com वर नोटिफीकेशन तपासून अर्ज करू शकतात. मात्र ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख उद्या, 1 नोव्हेंबर 2021 आहे. ONGC ने जारी केलेल्या नोटिफीकेशननुसार, या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार इंजिनीयरींग आणि भूविज्ञान विषयांमध्ये GATE 2021 स्कोअरद्वारे अर्ज करू शकतात.

या पदांसाठी अर्ज करणार्‍या जनरल / EWS / OBC श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 300 रुपये असेल. तर SC/ST/PWBD प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कात सूट देण्यात आली आहे. अनारक्षित आणि EWS श्रेणींमध्ये AEE (ड्रिलिंग आणि सिमेंटिंग) वगळता सर्व पदांसाठी वयोमर्यादा 30 वर्षे आहे, तर AEE (ड्रिलिंग आणि सिमेंटिंग) पदासाठी कमाल वयोमर्यादा 28 वर्षे आहे. तसेच, OBC (नॉन-क्रिमी लेयर) साठी वयोमर्यादा 33 वर्षे आणि AEE वगळता सर्व पदांसाठी (ड्रिलिंग आणि सिमेंटिंग) पदासाठी 31 वर्षे वयोमर्यादा आहे.

पदवीधर प्रशिक्षणार्थीसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा

ज्या उमेदवारांनी ग्रॅज्युएट ट्रेनी पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ONGC च्या www.ongcindia.com या अधिकृत वेबसाइटला भेट द्या त्यानंतर करिअर टॅबवर क्लिक करा. त्यानंतर 'GATE 2021 स्कोअरद्वारे अभियांत्रिकी आणि भूविज्ञान विषयांमध्ये GT भरती नवीन अर्जदारांवर यावर क्लिक करा. GATE 2021 नोंदणी क्रमांक आणि मेल आयडी एंटर करा. त्यानंतर फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा. आता अर्जाची फी भरा. यानंतर त्याची हार्ड कॉपी भविष्यातील संदर्भासाठी तुमच्याकडे ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT