RRB Paramedical Recruitment 2024 esakal
Jobs

RRB Paramedical Recruitment 2024 : रेल्वेत मोठी भरती! तब्बल 1376 जागा भरणार; मुंबईत नेमक्या किती जागा? Application Link

Railway Bharti 2024 Application Fee: खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्जाची फी रु 500 आहे. तर SC, ST, माजी सैनिक, PwBD, महिला, ट्रान्सजेंडर, अल्पसंख्याक किंवा आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBC) मधील उमेदवारांसाठी अर्जाची फी रु 250 रुपये आहे.

संतोष कानडे

RRB Paramedical Recruitment 2024 Apply Online

नवी दिल्ली : रेल्वे विभागामध्ये देशभरात पॅरामेडिकल स्टाफची भरती निघाली आहे. तब्बल १३७६ जागांसाठी रेल्वेने भरती प्रक्रिया सुरु केली असून १७ ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज प्रणाली सुरु झाली आहे. उमेदवारांना १६ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

पदनाम आणि भरावयाची पदे Paramedical Posts in Railway

  • आहारतज्ज्ञ : ५ पदे

  • नर्सिंग अधीक्षक: 713 पदे

  • ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट: 4 पदे

  • क्लिनिकल सायकोलॉजिस्ट: 7 पदे

  • डेंटल हायजिनिस्ट: ३ पदे

  • डायलिसिस तंत्रज्ञ: 20 पदे

  • आरोग्य आणि मलेरिया निरीक्षक ग्रेड-३: 126 पदे

  • प्रयोगशाळा अधीक्षक: 27 पदे

  • परफ्युजनिस्ट: 2 पदे

  • फिजिओथेरपिस्ट ग्रेड-२: 20 पदे

  • थेरपिस्ट: 2 पदे

  • कॅथ लॅबोरेटरी टेक्निशियन: 2 जागा

  • फार्मासिस्ट (प्रवेश श्रेणी): 246 पदे

  • रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन: 64 पदे

  • स्पीच थेरपिस्ट: 1 पोस्ट

  • कार्डियाक टेक्निशियन: 4 पदे

  • ऑप्टोमेट्रिस्ट: 4 पदे

  • ECG तंत्रज्ञ: 13 पदे

  • प्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड-२: 94 पदे

  • फील्ड वर्कर : १९ पदे

  • एकूण पदे- १३७६

वेतन किती मिळेल? Para Medical Salary in Railway Hospital

पदांसाठी शासनाने निश्चित केल्याप्रमाणे ४४९००, ३५४००, २९२००, २५५००, २१७०० आणि १९०० असा ग्रेड पे पदानुसार राहणार आहे. यामध्ये महागाई भत्ता आणि इतर केंद्र सरकारचे भत्ते जोडून मिळतील.

अर्जदारांना विहीत शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे अनिवार्य आहे. पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. जाहिरातीमध्ये त्याबाबत सविस्तर दिलेले आहेत. तसेच अर्जदाराने मेडिकली फीट असणं गरेजचं आहे. याशिवाय वेगवेगळ्या पदांसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहेत. यामध्ये आरक्षणानुसार वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे.

सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी खालील PDF लिंकवर क्लिक करा RRB Recruitment 2024 pdf

Detailed_CEN_04-2024_Paramedical_English.pdf
Preview

शुल्क किती? Examination Fee

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्जाची फी रु 500 आहे. तर SC, ST, माजी सैनिक, PwBD, महिला, ट्रान्सजेंडर, अल्पसंख्याक किंवा आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBC) मधील उमेदवारांसाठी अर्जाची फी रु 250 रुपये आहे. शैक्षणिक पात्रता आणि देशभरातील विभागानुसार जागांच्या माहितीसाठी रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

मुंबईत किती जागा?

मुंबईतल्या सेंट्रल आणि वेस्टर्न या दोन्ही झोनमध्ये मिळून २३६ जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी ११९, एससीसाठी ३४, एसटीसाठी १७, ओबीसीसाठी ४१ आणि ईडब्ल्यूएससाठी १५ जागा आहेत. अशा एकून मुंबईतल्या दोन्ही झोनमध्ये २३६ जागा रिक्त आहेत. मुंबई रेल्वे बोर्डाच्या वेबसाईटवरही सविस्तर माहिती उपलब्ध आहे. अधिकृत वेबसाईट : www.rrbmumbai.gov.in

ऑनलाइन अर्ज कसा करावा? CEN PARAMEDICAL POSTS Application Link

इच्छुक उमेदवारांनी रेल्वे भरती बोर्डाची वेबसाईट www.rrbapply.gov.in या लिंकवर क्लिक करावे. वेबसाईटवर Apply या टॅबवर क्लिक करावे. तुम्हाला Create An Account हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. उमेदवाराचे नाव, मोबाईल नंबर, आधार कार्ड क्रमांक आणि अन्य कागदपत्रे जोडावे लागतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT