पुणे : साल १९७०...एक मराठी तरुण परदेशात एका मोठ्या पगाराची नोकरी करत होता. आयआयटी मधून इंजिनियरिंगचे शिक्षण घेतलेला हा तरुण तरीही आतून अस्वस्थ होता. भारतात परतून आपल्या मातीसाठी काहीतरी करावं अशी स्वप्नं तो पाहात होता.
या काळात भारतात माहिती तंत्रज्ञानाचे वारे वाहत होते. भारत सरकारने परदेशातल्या भारतीय तरुणांना पुन्हा भारतात परतून देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा दिली आणि त्या तरुणाने या हाकेला प्रतिसाद दिला.
आयटी पार्कची पुण्यात पायाभरणी होत होती. तरुण उद्योजकांना गाळे वितरित केले गेले ;पण पदरी निराशा आली आणि या तरुणाला एक गाळाही मिळू शकला नाही पण हार न मानता त्याने सरकारशी पत्रव्यवहार सुरु केला आणि एका सरकारी प्रतिनिधीने आपलं स्वत:चं ऑफिस या तरुणाच्या स्वाधीन केलं..
आणि याच एका छोट्या गाळ्यात 'पर्सिस्टंट' नावाची आयटी क्षेत्रातली एक बलाढ्य कंपनी उभी राहिली...पेन्शनर्सचं शहर ते आयटी क्षेत्रातलं महत्त्वाचं केंद्र अशी ओळख बनलेल्या पुण्याच्या डेव्हलपमेंटमध्ये त्या तरुणानंही योगदान दिलं... होय आम्ही सांगतोय मराठी उद्योजक आनंद देशपांडे यांच्याबद्दल..
LINK :
अमेरिकेतील नोकरी सोडून पुण्यात आयटी कंपनीची स्थापना करणारे पर्सिस्टंट या जागतिक स्थरावरील नामांकित कंपनीचे संस्थपाक आनंद देशपांडे यांना 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' विषयी काय वाटतं याविषयी 'सकाळ' ची विशेष पॉडकास्ट सिरीज 'आमच्या काळी' मध्ये त्यांनी सविस्तर सांगितले आहे.
त्यांच्या बालपणापासून ते पर्सिस्टंटपर्यंतच्या प्रवासाबद्दल तर ते बोललेच आहेत पण त्यासोबतच आयटी क्षेत्राचे भविष्य, AI चा नोकऱ्यांवर होणार परिणाम, भविष्यातील नोकऱ्या अशा असतील, कामाचे तास किती असावेत आणि आजच्या तरुण पिढीसमोरील महत्वाचा प्रश्न स्ट्रेस मॅनेजमेंट या सगळ्या विषयांवर सविस्तर त्यांनी आपले मत या पॉडकास्ट मध्ये मांडले आहे.
इतका मोठा माणूस जेव्हा गावात भाजी आणायला जातो, जेव्हा त्यांचेच वडील त्यांच्याच कंपनीत काम करतात, जेव्हा आनंद देशपांडे सरांना टेन्शन येतं अशा अनेक रंजक प्रश्नांची उत्तरे देखील त्यांनी या पॉडकास्ट मध्ये दिली आहेत.
आनंद देशपांडे सरांसोबतच अनेक क्षत्रेतातील दिग्गजांच्या काळी नेणारी ' आमच्या काळी ' ही सिरीज दर रविवारी रात्री ८ वाजता सकाळच्या यु ट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध होते आहे. ही सिरीज नक्की पहा आणि तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.