Bharti Bhoirkar Sakal
काही सुखद

सासऱ्यांच्या प्रेरणेने तिने थाटला मिठाई व्यवसाय

तिला पापडी, शेव, फरसाण करता येते. घराच्या पुढे सुरू केलेला हा व्यवसाय. इतरांसाठी प्रेरणादायक आहे.

सकाळ वृत्तसेवा

कामशेत - कोरोनात (Corona) अनेकांचे रोजगार (Employment) गेले. हाताला काम नसल्याने विवेचना वाढली. याही परिस्थितीत काहींनी संधी शोधून संसाराचा गाडा नेटाने ओढायचा म्हणून तग धरली. कोणी भाजीपाला विकायला सुरुवात केली, कोणी वडापावची गाडी लावली, कोणी चहाची टपरी, कोणी घरून जेवणाचे डबे पुरवायला सुरुवात केली. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील मिठाईची (Sweet) मागणी ओळखून तिने हातात झाऱ्या घेऊन रेवडी, जिलेबी, मसूरपाक, बुंदी तळायला सुरुवात केली. भोयरे येथील भारती नितीन भोईरकर (Bharti Bhoirkar) असे या सावित्रीच्या लेकीचे नाव. (Bharti Bhoirkar Success in Business Motivation)

तिला पापडी, शेव, फरसाण करता येते. घराच्या पुढे सुरू केलेला हा व्यवसाय. इतरांसाठी प्रेरणादायक आहे. मोठ्या कढईत तळून काढलेल्या शेव पापडीचा घमघमाट दरवळतो. येथे पंचक्रोशीतील महिला पुरुष खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. दिवसाकाठी शेव पापडी रेवडी जिलेबी बुंदी विकून घर चालेल यापेक्षा अधिक उत्पन्न या पारंपरिक मिठाई विक्रीतून होत आहे. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या व्यवसायात तिने पाय रोवले अर्थात पतीच्या पाठिंब्यावर. शेतीला जोडधंदा म्हणून या व्यवसायाकडे या कुटुंबाने पाहिले.

यंदाच्या पावसात नुकसान झाले. सरकार भरपाई देईल तेव्हा देईल. पण आपणही व्यवसायात टिकले पाहिजे, हातात पैसे हवे तर हाताला कामही हवे, असा या सावित्रीच्या लेकीचे साधे गणित आहे. भोयरेतील भारती भोईरकर जेमतेम दहावीपर्यंत त्या शिकल्या. पती नितीन भोईरकर शेतकरी. पावसाच्या पाण्यावरची बिन भरवशाची शेती परवडत नाही म्हणून त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून भाड्याने जागा घेऊन शेव, रेवडीचे दुकान टाकले. घरच्या घरी बनवलेली मिठाईची मागणी वाढली. नितीनचे वडील गौतम भोईरकर मिठाईच्या दुकानात कामाला होते. त्यांच्याकडून धडे घेऊन त्यांच्या अनुभवातून हा व्यवसाय वाढू लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

Nashik Vidhan Sabha Election : ‘महायुती-महाविकास’चे अपक्ष उमेदवारांवर लक्ष; वरिष्ठ नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांशी संपर्क

Nanded Assembly Election 2024 : जातीय मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार?

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

SCROLL FOR NEXT