Tehsildar Amardeep Wakde esakal
काही सुखद

वीज पडून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू; शिरगावच्या कुटुंबाला शासनाचा 'आधार'

हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : शिवारात शेतीचे काम सुरु असताना वीज पडून रुपेश हणमंत यादव (Rupesh Yadav) (वय ३८) या शिरगावच्या (ता. कऱ्हाड) शेतकऱ्याचा (Farmer) जागीच मृत्यू झाला होता. त्यांना शासकीय (Government) मदतीसाठी अहवाल तयार करुन कऱ्हाड तहसील कार्यालयाने (Karad Tehsil Office) शासनाकडे पाठवला होता. त्यानुसार त्यांच्या कुटुंबीयांनी बुधवारी चार लाखांचा धनादेश तहसीलदार अमरदीप वाकडे (Tehsildar Amardeep Wakde) यांनी संबंधित शेतकऱ्याच्या घरी जावून कुटुंबीयांना प्रदान केला. (Four Lakh Assistance From The Government To Farmer Family In Shirgaon Satara Marathi News)

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात रुपेश यादव व थोरात शेतात काम करत असताना विजांचा कडकडाट सुरु झाला.

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात Rain रुपेश यादव व थोरात शेतात काम करत असताना विजांचा कडकडाट सुरु झाला. त्यादरम्यान यादव यांच्या अंगावर वीज पडली. त्यामध्ये ते जागीच ठार झाले, तर सोबत असलेले थोरात जखमी झाले. मोठा आवाज झाल्याने जवळपास शेतात असलेल्या शेतकऱ्यांना त्याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने संबंधित दोघांना उपचारासाठी उंब्रजच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुपेश यांचा तत्पूर्वीच मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांचे येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

त्यांच्या मृत्युमुळे त्यांच्या कुटुंबातील कर्ता माणूस गेल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला. संबंधित कुटुंबाला शासकीय मदत मिळवून देण्यासाठी मंडल अधिकारी युवराज काटे, तलाठी एकनाथ कुंभार, ग्रामसेवक शरद शिरसाट यांनी प्रयत्न केले. ते प्रकरण तहसील कार्यालयाकडून शासनाने पाठवण्यात आले. त्यानंतर संबंधित कुटुंबाला प्राप्त झालेला चार लाखांचा धनादेश तहसीलदार वाकडे यांनी यादव यांच्या पत्नी यांच्याकडे सुपूर्द केला. मंडल अधिकारी काटे, तलाठी कुंभार, ग्रामसेवक शिरसाट, सरपंच मनिषा यादव व कुटुंबीय यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Four Lakh Assistance From The Government To Farmer Family In Shirgaon Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT