काही सुखद

ग्रामस्थ खूश; उद्योजकाने उभारले 15 वनराई बंधारे

संदीप गाडवे

केळघर (जि. सातारा) : उन्हाळ्यात गावातील ग्रामस्थ, महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागू नये, गावातील नदीची पाणीपातळी टंचाई काळात टिकून लोकांना दिलासा मिळावा, या हेतूने येथील उद्योजक राजेंद्र धनावडे यांनी वेण्णा नदी आणि ओढ्यावर एक- दोन नव्हे तर तब्बल 15 हून अधिक वनराई बंधारे स्वखर्चाने उभारले असून, गावाप्रती श्री. धनावडे यांनी दाखवलेल्या या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
 
मुंबईत व्यवसायानिमित्त स्थायिक असलेल्या श्री. धनावडे यांनी गावाचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी पुढचे पाऊल टाकले आहे. केळघर येथे श्री. धनावडे यांनी वेण्णा नदी आणि ओढ्यावर नुकतेच जेसीबीच्या साहाय्याने बंधारे उभारण्यास सुरुवात केली आहे. यासाठी शिक्षक बॅंकेचे संचालक शंकर जांभळे, सरपंच रवींद्र सल्लक, उपसरपंच बजरंग पार्टे, माजी सरपंच सुनील जांभळे, सचिन पार्टे, सचिन बिरामणे, बाजीराव धनावडे, काशिनाथ बेलोशे, जगन्नाथ पार्टे, एकनाथ कडव, संतोष पार्टे, दीपक मोरे, संतोष पार्टे, आनंदा भिलारे, सतीश पार्टे, अमोल बेलोशे, यशवंत बेलोशे, सुभाष बेलोशे, समीर बेलोशे, दत्ता बिरामणे, सुनील बेलोशे, तानाजी पार्टे, नितीन पोतेकर, भैरवनाथ गणेशोत्सव मंडळ, साईनाथ मित्र मंडळाचे कार्यकत्यासह ग्रामस्थ ही परिश्रम घेत आहेत.

अहाे, ऐकलत का! स्वस्तात घर खरेदी झाली शक्य
 
मागील तीन ते चार वर्षांपासून दर वर्षी डिसेंबर- जानेवारी महिन्यात श्री. धनावडे हे केळघर आणि परिसरात वनराई बंधारे स्वखर्चाने बांधत आहेत. सामाजिक कार्यामध्ये नेहमी योगदान देणाऱ्या धनावडे यांचा हा उपक्रम प्रशंसनीय आहे. वेण्णा नदीवर व ओढ्यावर बंधारे बांधल्याने नदीची पाणी पातळी वाढते. गेल्या वर्षी सकाळ रिलीफ फंडाच्या मदतीतून तनिष्का गटाच्या पाठपुराव्यातून येथील वेण्णा नदी पात्रातील गाळ काढण्याचे व नदी रुंदीकरण करण्याचे काम केलेले होते. या वेळी श्री. धनावडे, ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी सहकार्य केले होते. या कामामुळे आणि धनावडे यांनी उभारलेल्या बंधाऱ्यांमुळे मार्च महिन्यापासून कोरोनाचा कहर सुरू असताना ऐन उन्हाळ्यात मुंबईकर चाकरमानी गावाकडे आलेले असतानादेखील पाणीटंचाई जाणवली नव्हती.

गृहराज्यमंत्र्यांनी काळजी व्यक्त करताच वाहनधारकांकडून 36 लाखांचा दंड वसूल

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT