भिलार (जि.सातारा) : महाबळेश्वर गिरिस्थानावरील प्रसिद्ध उद्योगपती हे कोरोनाबाधित रुग्णांसाठी मसिहा बनले असून दोन लाख रुपये किमतीची रेमडिसिव्हर इंजेक्शन्स त्यांनी दिली आहेत. महाबळेश्वरातील या उद्योगपतीने कोविड उपाययोजनांसाठी काही तरी मदत करण्याची भावना राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस आणि आर. डी. ग्रुपच्या कार्यकर्त्यांपुढे मांडली. या कार्यकर्त्यांनी आमदार मकरंद पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यातून महाबळेश्वर, पाचगणी, वाई येथील बाधित रुग्णांना दोन लाख रुपयांची रेमडिसिव्हरची 41 इंजेक्शन्स देण्याचे ठरले.
कोणी मयत झाल्यासच मिळताे आयसीयू बेड! महाराष्ट्रातील 'हा' जिल्हा सलाईनवर
या निधीतून इंजेक्शन्स खरेदी करून ती आमदार मकरंद पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. त्यावेळी महाबळेश्वरचे राष्ट्रवादी शहर अध्यक्ष दत्तात्रय वाडकर, युवक राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष रोहित ढेबे, माजी सभापती ऍड. संजय जंगम, आर. डी. ग्रुपचे अध्यक्ष संदीप मोरे, राष्ट्रवादी युवक कार्यकर्ते अनिकेत रिंगे, वाईचे नगरसेवक दीपक ओसवाल आदी उपस्थित होते. आमदार पाटील यांनी मदत केलेल्या उद्योगपतींचे आभार मानले.
कोरोना रुग्णांसाठी 500 इंजेक्शन्स पुरविणार ; ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या संकल्पनेतून यांचा पुढाकार
राष्ट्रवादीसह आर. डी. ग्रुपचे उल्लेखनीय कार्य
महाबळेश्वरमधील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस आणि आर. डी. ग्रुप नेहमीच सामाजिक उपक्रमात वेगळ्या पद्धतीने आपला वेगळा ठसा उमटवत असते. कोरोना काळात तळागाळातील वंचितांना अन्नधान्याची किट वाटण्यात आघाडी घेतली होती. यावेळी महागडी इंजेक्शन्स उपलब्ध करून कोरोना रुग्णांना दिलासा दिला आहे.
राज्याच्या क्रीडा विभागातील उपसंचालकासह जिल्हा, तालुका क्रीडाधिकाऱ्यांची बदली
Video : मोर्चा निघणार तेवढ्यात राजू शेट्टींना पोलिसांनी अडविले, मग काय घडले वाचा
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.