विंग (जि. सातारा) : कोरोना संकटात मदतीचा हात देताना गावकऱ्यांची माणुसकी येथे अक्षरशः धावून आली. ऑक्सिजनच्या तुटवड्याची गरज ओळखून गावातच ही यंत्रणा स्वखर्चातून उभी केली आहे. दोन दिवसांत कोविड योद्धा व्हॉट्सऍप ग्रुपिंगच्या माध्यमातून सव्वालाखाची मदत गोळा करून पोर्टेबल ऑक्सिजन किट खरेदी केले आहे.
सातारकरांनाे... हीच ती वेळ; बेफिकीरी नको
सध्या कोविड सेंटरला रुग्णांना दाखल करून घेताना बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आदी अडचणी निर्माण होत आहेत. मागील आठवड्यात येथील एका ज्येष्ठाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला. तोच टर्निंग पॉइंट गावकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरला. येथील रुग्णांसाठी गावातच ही यंत्रणा उभी करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला. कोविड योद्धा व्हॉटसऍप ग्रुप त्यासाठी तयार केला. ग्रुप ऍडमिननी यथाशक्ती आर्थिक मदतीचे आवाहन त्यावर केले. ग्रुप मेंबरनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मदतीसाठी अनेक हात पुढे सरसावले.
बाजारात आलेल्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या साडीची किंमत एकदा पाहाच
सामाजिक बांधिलकी जपताना 500 ते पाच हजारांपर्यंत थेट मदत बॅंक खात्यावर जमा केली. थेट ऑनलाइन मदत गोळा करण्यात यश आले. विशेषतः तरुणांनी त्यास चांगला प्रतिसाद दिला. युवाशक्तीनी एकजूट दाखवली. मग ज्येष्ठांनी हातभार लावला. अवघ्या दोन दिवसांत तब्बल सव्वालाखाची आर्थिक मदत गोळा झाली. त्यातून पोर्टेबल ऑक्सिजन किट खरेदीदेखील केले आहे. ग्रामपंचायतीच्या ताब्यात ते दिले आहे. अद्याप मदतीचा ओघ सुरूच आहे.
फुटबॉलपटू नेमारचा कोरोना रिपोर्ट आला पॉझिटिव्ह, कोरोनाकाळात सहलीला जाणं पडलं महागात
आरोग्य विभाग अणि प्रशासनाच्या मदतीने गावातच एक छोटे कोरोना केअर सेंटर उभे करण्याचा गावकऱ्यांनी निर्धार केला आहे. तूर्तास येथील अतिजोखमीच्या रुग्णास प्राणवायूची गरज भासल्यास ग्रामविकास अधिकारी अथवा येथील प्राथमिक उपकेंद्रात संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.