130 year old almanac from 1851 till now form karkare in rajapur ratnagiri 
कोकण

भारीच की ; चक्क यांच्याकडे आहे 1851 पासून आतापर्यंतची 130 वर्षांची जुनी पंचांग....

मकरंद पटवर्धन

रत्नागिरी : हिंदू संस्कृतीत पंचांग बघूनच सणवार, चांगल्या कामाचा प्रारंभ करण्याची प्रथा आहे. शिवाय जन्मवेळेनुसार पंचांग बघून ज्योतिष सांगितले जाते. खूप जुनी पंचांग आता पाहायलासुद्धा मिळत नाहीत. परंतु, वडिलांना ज्योतिषशास्त्राची आवड असल्याने त्यांनी जपून ठेवलेली व स्वतः दरवर्षीची पंचांग जमवून त्याचा संग्रह मूळचे बोरसूत (ता. संगमेश्‍वर) गावचे पेन्शनर तलाठी नरहर गोविंद करकरे यांनी केला आहे. त्यांच्याकडे सन 1851 पासून आतापर्यंतची 130 पंचांग आहेत. ही दुर्मिळ पुस्तके त्यांनी सुस्थितीत ठेवली आहेत. 


श्री. करकरे येथील टिळक आळीतील गोकूळ डेअरीचे मालक देसाई यांच्याकडे आले असता त्यांनी "सकाळ'ला आपल्या संग्रहाविषयी माहिती दिली. जातकरहस्य, बाळबोध ज्योतिष भाग 1, सार्थ स्त्री जातक, सटीक जातकालकार, उडुदायप्तदीप, स्वप्नाध्याय, विषार, षट्‌पंचाशिका, आदी वीस दुर्मिळ पुस्तके आहेत. ज्योतिषविषय नवीन शिकणाऱ्यांसाठी गोविंद रामचंद्र मोघे लिखित "ज्योतिर्मयूख' हे पुस्तकही आहे.

केकावली, अभंग, श्‍लोक, ओव्या, आर्या, स्वगत (जयप्रकाश नारायण), संगीत सौभद्र (संस्कृत), एकनाथी भागवत, भक्तीमार्ग प्रदीप अशी सुमारे 80-90 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेली पुस्तके आहेत. श्री. करकरे हे 91 वर्षांचे असून त्यांची स्मरणशक्ती चांगली आहे. ते म्हणाले, माझे वडील पुस्तके वाचून ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करत. अनेक पुस्तके वडिलांची आठवण म्हणून जपून ठेवली आहेत. सर्व पंचांग वर्षानुसार बाईंडिंग करून घेतली आहेत. खूप जुनी पंचाग असल्याने ज्योतिष अभ्यासकांना त्याचा उपयोग करता येईल. 


1947 मध्ये झाले तलाठी 
श्री. करकरे हे सुंदर हस्ताक्षर व मुलाखतीत उत्तीर्ण झाल्याने 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सतराव्या वर्षी तलाठी म्हणून नोकरीत रुजू झाले. देवरूख येथे शासकीय कार्यालयात ते अनेकदा कागदपत्रांबाबत माहिती, सल्ला देण्याकरिता जातात. विनामूल्य अनेकांना मोडीलिपीचे मराठीत भाषांतर करून देतात.

 संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba siddiqui case: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट रचणाऱ्या शुभम लोणकरच्या निशाण्यावर पुण्यातील बडा नेता; पोलिस तपासात धक्कादायक माहिती

Mumbai Temperature: मुंबईच तापमान पुन्हा वाढलं, कमाल तापमान ३६.८ अंशांवर

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या ८७२ कर्मचाऱ्यांना नोटिसा! प्रशिक्षणालाही दांडी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढली यादी; आता दाखल होणार गुन्हे अन्‌ शिस्तभंगाची कारवाई

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

SCROLL FOR NEXT