21 year old youth lady winning election and sarpanch of village in sangameshwar ratnagiri 
कोकण

गाव कारभाराची धुरा आता कल्याणीच्या हातात ; २१ व्या वर्षी सरपंचपदाची मानकरी

संदेश सप्रे

देवरूख (रत्नागिरी) : बीएस्सीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेली अवघ्या २१ वर्षांची तरुणी सरपंचपदावर विराजमान झाली आहे. तालुक्‍यातील हे सर्वात तरुण नेतृत्व ठरले आहे. संगमेश्‍वर तालुक्‍यातील निवे बुद्रुक येथील गावकऱ्यांनी उच्चशिक्षित कल्याणी जोशी हिच्या हाती गाव कारभाराची धुरा सोपवली आहे. कोकणातील इतक्‍या लहान वयात सरपंच बनणारी ती पहिलीच तरुणी आहे.

संगमेश्‍वर तालुक्‍यात सर्वात कमी वयाची सदस्य म्हणून निवे बुद्रुक येथील कल्याणी ही बिनविरोध निवडून आली. गावच्या विकासाचा ध्यास घेऊन कल्याणीने ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा विचार पक्‍का केला होता. शिक्षित असल्याने गावकऱ्यांनीही तिला बिनविरोध निवडून देण्याचा निर्णय घेतला. गावपॅनेलची उमेदवार म्हणून ती निवडून आली. त्याचबरोबर तिच्या हातात गावाचा कारभार देण्याचा निर्णयही घेतला.

बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या वेळी सरपंचपदाची माळ पडल्याने सर्वात तरुण वयात सरपंच होण्याचा मान कल्याणीने मिळवला आहे. तिला सरपंच बनवण्यासाठी गावातील लवू माने, प्रकाश जोशी, विजय राऊत, कृष्णा जोशी, अमोल जाधव, सुरेश महाडिक, दिनकर विभूते, सचिन इप्ते, दीपक लिंगायत, बी. टी. यादव, वैभव गावणकर, अनंत चौगुले यांचा मोलाचा वाटा होता.

"निवे गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. गावाने माझ्यावर जो विश्‍वास टाकला, त्याला कधीच तडा जाऊ देणार नाही. सर्वांना विश्‍वासात घेऊनच गावाचा विकास केला जाईल. गावात शासकीय योजना सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करेन."

- कल्याणी जोशी, सरपंच, निवे

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

Aditya Thackeray Bag : आदित्य ठाकरेंची बॅग तपासली अन् काय सापडलं? व्हिडिओ पाहा

IPL Auction 2025 मधून तब्बल १००० खेळाडूंचा पत्ता कट; आता २०४ जागांसाठी ५७४ खेळाडू रिंगणात; जाणून घ्या तपशील

SCROLL FOR NEXT