in november Online Exam for Hingoli ZP Vacancies Schedule announced marathi news Sakal media
कोकण

लंडनमधून गिफ्ट देण्याच्या आमिषाने शिक्षिकेला 38 लाखांचा ऑनलाईन गंडा; कशी झाली फसवणूक? जाणून घ्या

CD

कणकवली, ता. ३ : व्हॉटस्‌ॲपवरून ओळख झालेल्‍या लंडनस्थित मित्राने पाठविलेल्या बर्थडे गिफ्टच्या मोहापायी कलमठ येथील एका शिक्षिकेला तब्‍बल ३८ लाख तीन हजार ५०० रुपये गमवावे लागले आहेत. या प्रकरणी लंडन येथील दोघांविरोधात कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कलमठ येथे ५३ वर्षीय शिक्षिकेची लंडन येथील ख्रिस अँड्रीज याच्याशी गणेश चतुर्थी कालावधीत व्हॉट्‌सॲपच्या माध्यमातून ओळख झाली. त्‍यानंतर महिनाभर चॅटिंग सुरू होते. ऑक्‍टोबरच्या पहिल्‍या आठवड्यात अँड्रीज याचा वाढदिवस होता. त्‍यानिमित्ताने मी सर्व मित्रांना ५० हजार पाऊंड कॅश असलेले ‘बर्थ डे गिफ्ट’ पाठवले आहे. तुम्‍हालाही पाठवणार आहे. तुमचा पत्ता द्या, असे ख्रिस अँड्रीज याने त्‍या शिक्षिकेला सांगितले.

सुरुवातीला त्‍या शिक्षिकेने गिफ्ट नको, असे सांगितले. नंतर खूप आग्रह झाल्‍यानंतर त्‍या शिक्षिकेने आपला पत्ता ख्रिस अँड्रीज याला दिला. नऊ ऑक्‍टोबरला त्‍या शिक्षिकेला सुनीती नावाच्या महिलेने हिंदी भाषेतून दूरध्वनी केला. आपण कस्टम कार्यालयातून बोलत आहोत. तुमच्या नावे लंडन येथून ख्रिस अँड्रीज या व्यक्‍तीने गिफ्ट पाठवले आहे. ते गिफ्ट स्कॅन केले असता त्‍यामध्ये ५० हजार पाऊंडची करन्सी आढळून आली आहे. विदेशातून बेकायदा करन्सी मागविल्‍या प्रकरणी तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो; मात्र आपण हे प्रकरण मिटवतो तसेच गिफ्टमधील करन्सीही तुम्‍हाला मिळवून देऊ, त्‍या बदल्‍यात पाच लाख रुपये कर भरावा लागले, असे सांगितले.

यानंतर घाबरलेल्‍या त्‍या शिक्षिकेने, सुनीती नावाच्या महिलेने पाठविलेल्‍या अकाउंटवर सुरुवातीला दोन लाख आणि त्‍यानंतर तीन लाख रुपये पाठवले. त्‍यानंतर विविध कर आणि इतर शासकीय शुल्कापोटी नऊ लाख तीन हजार ५००, त्‍यानंतर पुन्हा १२ लाख तीन हजार ५००, त्‍यानंतर पुन्हा १० लाख ५० हजार अशी एकूण ३८ लाख तीन हजार ५०० रुपयांची रक्‍कम पाठवली.

इंग्लंड येथून ५० हजार पाऊंड म्‍हणजे भारतीय रुपयामध्ये सुमारे ५१ लाख ३१ हजार रुपये मिळणार असल्‍याने त्‍या शिक्षिकेने स्वत:च्या खात्यासह इतर मैत्रिणींकडून रक्‍कम घेऊन ऑनलाईन माध्यमातून पाठवली होती; मात्र ३८ लाख तीन हजार ५०० रुपये पाठविल्‍यानंतर देखील पुन्हा १५ लाख रुपयांची मागणी झाली, त्‍यामुळे ख्रिस अँड्रीज आणि सुनीती या दोहोंकडून आपली फसवणूक होत असल्‍याचे त्‍या शिक्षिकेच्या लक्षात आले.

पैसे पाठविण्याचा हा प्रकार ९ ते २६ ऑक्‍टोबर २०२३ या कालावधीत झाला होता. त्‍यानंतर आज त्‍या शिक्षिकेने कणकवली पोलिस ठाण्यात येऊन आपली ऑनलाईन माध्यमातून फसवणूक झाल्‍याची तक्रार दिली.

रक्कम गोठविण्याचा प्रयत्न


पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी सांगितले, की संबंधित शिक्षिकेने पैसे पाठविताना जी बँक खाती वापरली आहेत, त्या बँक खात्यामधील रक्‍कम गोठवावी, यासाठी सायबर क्राईमच्या माध्यमातून बँकांना कळविण्यात आले आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT