Goa Fort esakal
कोकण

गोवा किल्ल्याचे रुपडे पालटणार! तटबंदी दुरुस्तीसाठी शासनाकडून तब्बल 'इतक्या' कोटींच्या निधीला मान्यता

गोवा किल्ल्याचा इतिहास पाहता इ.स. १७५४ मध्ये आंग्यांच्या आरमाराने गोवा गडाजवळ डचांच्या ३ जहाजांवर हल्ला केला.

राधेश लिंगायत

३ एप्रिल १७५५ रोजी हा गोवा गड तुळाजी आंग्र्यांच्या ताब्यात होता. १६ एप्रिल १७५५ दरम्यान रामाजी महादेव यांनी आंग्ग्रांचे जे ७ किल्ले घेतले, त्यामध्ये गोवा किल्लाही होता.

हर्णै : येथील गोवा किल्ल्याच्या (Goa Fort) तटबंदी दुरुस्तीसाठी शासनाकडून ६ कोटी ९२ लाख ७१ हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, त्यामुळे लवकरच गोवा किल्ल्याला आता नवीन रुपडे येणार असल्याने इतिहासप्रेमी पर्यटक व दुर्गप्रेमी यांना दिलासा मिळणार आहे.

दापोली तालुक्यात (Konkan Tourism) एकमेव असे हर्णे गाव आहे, जेथे गोवा, फत्तेगड, कनकदुर्ग हे भुईकोट ते सुवर्णदुर्ग हा जलदुर्ग अशा चार किल्ल्यांचा इतिहास आहे. येथील गोवा किल्ल्याला संरक्षक असलेली काळ्या पाषाणाची तटबंदी अनेक वर्षांपासून ढासळत चालली होती. त्यामुळे इतिहासाचा साक्षीदार असलेला गोवा किल्ला हा संवर्धनाच्या प्रतीक्षेत होता.

या किल्ल्यात असलेल्या ऐतिहासिक (Historical Fort) खुणा या आधीच भग्नावस्थेत गेलेल्या आणि त्यात तटबंदी ढासळू लागल्यामुळे इतिहासाच्या वैभवशाली पराक्रमाच्या खुणा नष्ट होत चालल्या होत्या. उशिराने का होईना, पण आता याकडे शासन व लोकप्रतिनिधींनी लक्ष घातले आहे.

६ कोटी ९२ लाख ७१ हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. याबाबतचा आदेश राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने नुकताच जारी केला. या किल्ल्याची तटबंदी पूर्णपणे काम लवकरच सुरू होईल, अशी आशा स्थानिकांमधून केली जात आहे. कोकणात पर्यटनप्रेमींसाठी हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. मात्र, त्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याबद्दल इतिहासप्रेमी आणि पर्यटकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.

या सगळ्याचा विचार करून पुरातत्व विभागाच्या संचालकांकडून प्रशासकीय मान्यता अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते. त्याला मान्यता मिळाली आहे. राज्य पुरातत्व विभागाच्या संचालकांची यावर नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेल्या या गोवा किल्ल्याचा इतिहास पाहता इ.स. १७५४ मध्ये आंग्यांच्या आरमाराने गोवा गडाजवळ डचांच्या ३ जहाजांवर हल्ला केला. त्यात डचांची २ जहाजे जळाली व तिसरे पूर्ण मोडकळीस आले. या प्रसंगात आंग्र्यांची काही जहाजे जळालेली माहिती सांगितली जाते.

३ एप्रिल १७५५ रोजी हा गोवा गड तुळाजी आंग्र्यांच्या ताब्यात होता. १६ एप्रिल १७५५ दरम्यान रामाजी महादेव यांनी आंग्ग्रांचे जे ७ किल्ले घेतले, त्यामध्ये गोवा किल्लाही होता. १७५५ मध्ये पेशव्यांचा इंग्रजांशी तह झाला. त्या तहानुसार गोवा गड इंग्रजांनी कमांडर जेम्सच्या नेतृत्वाखाली जिंकून पेशव्यांच्या ताब्यात दिला. या गोवा गडालाच हर्णेचा किल्ला, असे देखील म्हटले जाते. इ.स. १८१८ मध्ये कर्नन केनेडीने हा गोवा गड इंग्रजांसाठी जिंकून घेतला. पुढे इ.स. १८६२ मध्ये गोवा गडाची पाहणी करण्यात आली.

तेव्हा १९ शिपाई गोवा गडाची देखभाल करत होते. त्या पाहणीत गडावर ६९ तोफा असल्याचे आढळून आले. हा किल्ला सुवर्णदुर्गच्या संरक्षणसाठी शिवकाळात बांधला गेला असण्याची जास्त शक्यता वाटते. किल्ल्यावरील अवशेषांवरून आंग्रे, पेशवे व इंग्रज यांच्या काळात देखील किल्ल्यात वेळोवेळी दुरूस्ती झाली असावी असे अवशेषावरून दिसते. अशा ऐतिहासिक या किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम केले जाणार असल्याने पर्यटकांना, तसेच दुर्गप्रेमींना देखील दिलासा मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli MIDC Fire : सांगली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती; दोघांचा मृत्यू, 10 जणांची अवस्था गंभीर

IPL Schedule: क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! पुढील 3 हंगामाच्या तारखा BCCI ने केल्या जाहीर

Latest Maharashtra News Updates : निकालाच्या पार्श्वभूमीवर 'मविआ'च्या प्रमुख नेत्यांत 'हाॅटेल हयात'मध्ये तब्बल अडीच तास चालली बैठक

Pre Wedding Photoshoot: 'या' लोकेशनवर फोटोग्राफरशिवायही करू शकता जोडीदारासोबत परफेक्ट फोटोशुट

Google Gemini : गुगल जेमीनीची मेमरी झाली शार्प! काय आहे या नव्या फीचरमध्ये खास?

SCROLL FOR NEXT