70 years old lady won election and to start working of gram panchayats in chiplun 
कोकण

७० वर्षांच्या शेवंती आजींची कमाल ; आता कारभार हाकण्यास तयार

नागेश पाटील

चिपळूण (रत्नागिरी) : तालुक्‍यातील ६४ ग्रामपंचायतीच्या कारभाराची चावी महिलांच्या हाती गेली आहे. ओवळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गावविकास पॅनेलने एकहाती सत्ता मिळविली. सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीत ओवळी ग्रामपंचायतीसाठी अनुसूचित जमाती आरक्षण पडले. या प्रवर्गातून शेवंती पवार या एकमेव सदस्या बिनविरोध विजयी झाल्या होत्या. त्यामुळे त्या सरपंच झाल्या. उपसरपंचपदी पूर्वीचा सरपंचपदाचा अनुभव असलेले दिनेश शिंदे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.

इच्छाशक्ती असेल तर कोणतीही कामे करण्यास अडचण येत नाही. यापूर्वी ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून काम केल्याचा अनुभव पाठीशी आहे, असे आत्मविश्‍वासपूर्ण उद्‌गार शेवंती बब्या पवार या ७० वर्षाच्या आजींने काढले. ओवळीच्या सरपंचपदावर निवड झाल्यानंतर त्या आत्मविश्‍वासाने बोलत होत्या.

या निवडणुकीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दिनेश शिंदे यांनी हॅट्कट्रिक साधली तर प्रभाग क्र. १ मध्ये सदस्य पदाकरिता अनुसूचित जमाती असे आरक्षण पडले होते. येथील आदिवासी समाजाने ७० वर्षीय शेवंती पवार यांना बिनविरोध निवडून देण्याचा निर्णय घेतला. सरपंच, उपसरपंचाचा पॅनेलच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. आमदार शेखर निकम यांनी पॅनेलच्या सर्व विजयी सदस्यांचे अभिनंदन केले आहे. या वेळी दिनेश शिंदे, निकिता शिंदे, माधवी शिंदे, संपदा बोलाडे, केशव कदम, दीपिका शिंदे यांच्यासह पॅनेलचे पदाधिकारी, ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. 

यापूर्वीही होत्या सदस्य

यापूर्वी शेवंती पवार यांनी सदस्यपद भूषविले असल्याने त्यांना ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा अनुभव आहे. सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीत ओवळीमध्ये अनुसूचित जमातीसाठी सरपंचपदही आरक्षित झाले, अन आजीच्या बाजूने नशिबाचा कौल मिळाला.

आत्मविश्‍वासाने उत्तर 

तालुक्‍यातील ओवळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पवार विराजमान झाल्यावर या कारभार कशा करणार, अशा शंकांना शेवंती पवार यानी आत्मविश्‍वासाने उत्तर दिले. उपसरपंच दिनेश शिंदे हेदेखील गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायतीत कार्यरत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीतर्फे विकासकामे होण्यात कोणत्याही अडचणी येणार नाहीत, अशी ग्वाहीही दिली.

संपादन - स्नेहल कदम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:ठाणे पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवरच

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT