accident case in gihargar husband and wife both died in this accident in ratnagiri 
कोकण

सेल्फीच्या मोहात बामणघळीत पडून पतीपत्नीचा मृत्यू

मयुरेश पाटणकर

गुहागर (रत्नागिरी) : तालुक्यातील हेदवीच्या समुद्रकिनारी असलेल्या बामणघळ या पर्यटनस्थळी धोकादायक ठिकाणी सेल्फी घेताना ठाण्यातून आलेली पर्यटक सुचेता माणगावकर (वय 33) तोल गेला. तिला धरण्यासाठी पती अनंत माणगावकर (वय 366) धावले. मात्र दोघेही धोकादायक घळीत पडले. घटनेनंतर अर्ध्या तासात हेदवीतील ग्रामस्थ तेथे पोचले. स्थानिक तरुणांनी खडपात जावून दोघांनी पाण्याबाहेर खेचले. पण दुर्दैवाने तो पर्यंत पतीपत्नीचा मृत्यु झाला होता.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे 11 वा. ठाण्यातील चार पर्यटक अनंत माणगावकर, सुचेता माणगावकर, अनंत माणगावकर यांची आई आणि भाचा असे स्वतंत्र वाहनाने हेदवीच्या समुद्रकिनाऱ्यावर पोचले. चालकासह हे चौघेजण बामणघळ पहाण्यासाठी गेले. चालक आणि अनंत माणगावकर यांची आई डोंगरात थांबली. तर भाचा, अनंत माणगावकर आणि त्यांची पत्नी सुचेता माणगावकर हे तिघे घळीच्या काठावर येवून समुद्राचे घुसळत आत शिरणारे पाणी पहात होते. यावेळी सुचेता माणगावकरला दोघांचा सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.

समुद्राचे घुसळत वेगाने घळीत शिरणारे पाणी देखील सेल्फीसोबत टिपावे यासाठी सुचेता मागे सरकली आणि तिचा तोल गेला. पत्नी घळीत पडते आहे हे लक्षात आल्यावर अनंत माणगावकर यांनी सुचेता पकडण्याचा प्रयत्न केला. आणि दोघेही घळीत पडले. वेगाने घुसळणाऱ्या पाण्यातून बाहेर पडणे या दोघांना शक्यच नव्हते. शिवाय दोन्ही बाजुला असलेल्या दगडांवरही ते दोघे आपटले.

चालकाने दुरुनच ही घटना पाहिली आणि त्याने मदतीसाठी आरडाओरडा सुरु केली. त्यावेळी समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात असलेले स्थानिक तरुण धावत घळीपर्यंत पोचले. दोघेही घळीत दिसत नाहीत म्हटल्यावर स्थानिक तरुण आपला जीव धोक्यात टाकून घळीत पाणी शिरते त्याठिकाणी खडपात पोचले. जाड दोरखंड आणि गळ मागविण्यात आला. सुमारे अर्ध्या तासांनी घळीच्या मुखातून पतीपत्नी समुद्रात वाहत असताना दिसली. एखाद्या माशा पकडावे त्याप्रमाणे मोठा गळ टाकून स्थानिकांनी दोघांना खडकातून पाण्याबाहेर काढले. परंतू दुर्दैवाने दोघांचाही मृत्यु झाला होता.

दरम्यानच्या काळात हेदवीचे सरपंच गजानन हेदवकर, ग्रामविकास अधिकारी, पोलीस पाटील रवींद्र मोहिते, ग्रामपंचायतीचे अन्य सदस्य हे देखील बामणघळ परिसरात पोचले. पोलीस पाटील रवींद्र मोहितेंनी पावणे एकच्या सुमारास गुहागर पोलीस ठाण्यात अपघाताची खबर दिली आहे. बचाव कार्यात सुहास भाटकर, अंगद भाटकर, गजानन पवार, अमेय हळदणकर, दिपक भाटकर, मिलिंद पाटेकर, अभिजीत राऊत आदींचा सहभाग होता.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT