Action On Fishing Boat On Mirya Beach Ratnagiri Marathi News  
कोकण

मिऱ्या येथे 'या' संशयामुळे मासेमारी नाैकेवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - एलईडीद्वारे मासेमारीस महाराष्ट्रात कायद्याने बंदी आहे. मात्र, तरी राजरोस एलईडीचा वापर करून मासेमारी केली जात असावी, असा संशय निर्माण करणारी कारवाई मत्स्य खात्याने केली. मिऱ्या येथे एका मासेमारी नौकेवरून सहाय्यक मत्स्य विभागाने जनरेटर जप्त केला आहे. या संदर्भातील खटला आता तहसीलदारांकडे चालणार आहे. 

बुधवारी ( ता. 8) झालेल्या या कारवाईमुळे संबंधित नौका कारवाई करून स्थानबद्ध ठेवली आहे. यामुळे पारंपरिक आणि पर्ससिन यांच्यातील वाद पुन्हा उफाळण्याच्या शक्‍यतेने या बोटींवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने एलईडीद्वारे मासेमारीवर कायद्याने बंदी घेतली आहे. तरीही खोल समुद्रात एलईडीद्वारे मासेमारी सुरू असल्याचा दावा पारंपरिक मच्छीमारांनी केला आहे.

कारवाईबाबत काहीशी गुप्तता

बुधवारी (ता. 8) मिऱ्यावर अशा प्रकारे एक नौका लागल्याची माहिती मत्स्य विभागाला मिळाली. त्यानंतर मत्स्य विभागाचे अधिकारी आनंद पालव आणि परवाना अधिकारी यांनी नौकेवर जाऊन जनरेटर जप्त केले. त्यावर मासे किंवा लाईट सापडले नसल्याचे पालव यांनी सांगितले. याबाबत संबंधित नौका मालकावर तहसीलदारांकडे खटला दाखल केला आहे. मात्र, कारवाईबाबत काहीशी गुप्तता बाळगण्यात आली आहे. एलईडी मासेमारीला उघडपणे विरोध केला जात आहे.

मत्स्य विभागाने कठोर पावले उचलण्याची गरज

काही ठिकाणी मासेमारी राजरोस सुरू आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छीमार व त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते, असा आरोप पारंपरिक मच्छीमार करत आहेत. मासळी कमी प्रमाणात मिळत असल्याने हा व्यवसाय आतबट्ट्यात आहे. एलईडीद्वारे सोप्या पद्धतीने मासेमारीवर अधिक भर दिला जात असून ते थांबविण्यासाठी मत्स्य विभागाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

Latest Maharashtra News Updates live : दिवाळीनंतर कार्यकर्त्यांची दिवाळी

SCROLL FOR NEXT