कोकण

होळी, आंगणेवाडी यात्रेसाठी रेल्वेच्या जादा गाड्या

सकाळवृत्तसेवा

कणकवली - होळी उत्सवासाठी कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्यांना खेडपासून पुढील सर्व स्थानकात थांबे असतील. याखेरीज आंगणेवाडी यात्रोत्सवासाठीही जादा गाड्या सोडण्याची ग्वाही कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी दिल्याची माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिली.

ऊपरकर यांनी पत्रकात म्हटले की, कोकण रेल्वेच्या विविध प्रश्‍नांबाबत नुकतीच कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांची भेट घेतली. यात सर्वच प्रमुख प्रश्‍नांवर चर्चा झाली. यात कोकण रेल्वेच्या स्टॉलसाठीचे अर्ज इंग्रजी आणि हिंदीतून असतात. ते मध्य रेल्वेच्या नियमात बसत असेल, तर मराठीमधून करण्यात येतील. तसेच रेल्वे स्थानकावरील स्टॉल आणि कर्मचारी भरतीमध्ये कोकणातील उमेदवारांना जास्त प्राधान्य दिले जाणार आहे.

मुंबईतून मंगलोरकडे जाणाऱ्या मंगलोर एक्‍सप्रेसला दादर स्थानकात थांबा नाही. विरार येथून येणाऱ्या प्रवाशांना दादर मध्यवर्ती असल्याने तेथे थांबा मिळविण्यासाठी प्रस्ताव पाठविला जाईल. तुतारी एक्‍स्प्रेस सीएसटी स्थानकावरून सोडण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेला कोकण रेल्वेकडून पाठविण्यात येईल, असे सांगितले. सर्व गाड्यांना दिवा स्थानकात थांबा मिळण्यासाठी मध्य रेल्वेला प्रस्ताव पाठविण्याचेही गुप्ता यांनी मान्य केल्याचे उपरकर म्हणाले.

तेजस गाडीची वेळ बदलल्याने ती सकाळी ५.५० ला सुटून १२.४० ला पोचते. त्यामुळे रेल्वेमध्ये देण्यात येणारा आहार ८.३० ला दिल्यानंतर १२.४० ते १.३० पर्यंत कोणताही आहार उपलब्ध होत नसल्याने चार तास उपाशी राहावे लागते. त्यासाठी चिपळूण किंवा रत्नागिरी येथे ११ दरम्यान नाश्‍ता अथवा जेवण देण्याचा प्रस्ताव आयआरसीटीसीला पाठवून देण्यात येईल, असे आश्‍वासन दिल्याचे उपरकर म्हणाले.

याखेरीज तेजस किंवा जनशताब्दी गाडीला वैभववाडी येथे थांबा दिला जावा. हमसफर गाडीला सिंधुदुर्ग जिल्हयात थांबा द्यावा आदी मागण्या करण्यात आला.

मनसेच्या या शिष्टमंडळामध्ये विद्यार्थी सेनेचे शैलेश शृंगारे, अमोल साळुंखे, माथाडी कामगार सचिव सुमन तारी, मनसेचे पदाधिकारी प्रशांत बागवे, राजू साटम, दीपक रावराणे, राकेश पेडणेकर, संतोष मयेकर, मंगेश खोचरेकर व कोकण रेल्वेचे अधिकारी आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Retirement: विराटपाठोपाठ रोहित शर्माचाही T20I क्रिकेटला अलविदा! वर्ल्ड कप जिंकत केली निवृत्तीची घोषणा

Virat Kohli T20i Retirement : वर्ल्ड कप जिंकल्यानंतरच विराट कोहलीने का घेतली निवृत्ती? जाणून घ्या 'त्या' मागील मोठे कारणे

Rohit Sharma : तीन-चार वर्षे कोणत्या परिस्थितीतून गेलोय... वर्ल्डकप जिंकल्यानंतर रोहितनं मन केलं मोकळं

T20 World Cup: धोनी, कपिल अन् गांगुलीच्या यादीत आता रोहितनंही मिळवला मान; पाहा भारताचे ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या कर्णधारांची यादी

T20 World Cup Final : सुसाट सुटलेली आफ्रिकेची गाडी शेवटच्या टप्प्यावर अडखळली, शेवटच्या तीन षटकांत काय घडले?

SCROLL FOR NEXT