कोकण

घरडा कंपनीत पुन्‍हा वायुगळती

१७ जणांना बाधा; उपचारांती सोडले घरी, सतत होताहेत दुर्घटना

सकाळ वृत्तसेवा

खेड : लोटे औद्योगिक वसाहतीतील घरडा केमिकल्स या कंपनीच्या प्लॅन्टमधील ॲसिडवाहिनीला गुरुवारी (ता. २५) सायंकाळी गळती लागली. हे अॅसिड सांडपाण्यात मिसळल्याने विषारी वायू निर्माण होऊन १७ कर्मचाऱ्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानंतर कंपनीने कामगारांना तातडीने चिपळूणच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. बाधितांपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. कंपनीत अशी दुर्घटना होण्याचा पाच महिन्यांतील हा दुसरा प्रकार आहे.

अॅसिटिक केमिकलच्या पाईपलाइनला गळती लागली आणि एएमटीसीएसी रसायनाचा त्यालगत प्लांटमधून वाहणाऱ्या पाण्याशी आणि हवेशी संपर्क आला. त्यातून एचसीएल हा विषारी वायू निर्माण झाला. त्या प्लांटमध्ये काम करणाऱ्या कामगारांना श्वसनाची बाधा झाली. कंपनी व्यवस्थापकांनी तत्काळ या कामगारांना रुग्णालयात दाखल केले. आज सर्वांची प्रकृती ठीक असल्याने रुग्णालयातून सोडण्यात आल्याची माहिती कंपनीचे व्यवस्थापक अनिल भोसले यांनी दिली.

पाच महिन्यांपूर्वीही अपघात

औद्योगिक वसाहतीतील केमिकल कंपनी आणि अपघात हे आता नेहमीचेच झाले आहे. पाच महिन्यांपूर्वी याच कंपनीत झालेल्या भीषण स्फोटामध्ये चार कामगारांचा बळी गेला होता. त्या आधीही या कंपनीत जीवघेणे अपघात झालेले आहेत. गेल्या वर्षभरात या औद्योगिक वसाहतीत ५ ते ६ मोठ्या दुर्घटना घडल्या असून यामध्ये १५ हून अधिक कामगारांचा बळी गेला आहे.

कंपनी प्रशासन माहिती देत नाही...!

गुरुवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला; पण याची कोणतीही कल्पना कंपनी प्रशासनाने कळू दिली नाही. अपघात झाल्यावर कंपनी माहिती देत नाहीत. त्यामुळे दुर्घटनेची माहिती रात्री उशिरापर्यंत बाहेर पडली नाही. कंपनीच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही पाठपुरावा करू, तसेच बाधितांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी, अशी प्रतिक्रिया भाजपचे जगदीश आंब्रे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:ठाणे पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवरच

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT