चिपळूण (रत्नागिरी) : पोलिसांच्या रोषाला सामोरे जावे लागल्यानंतर चिपळूणातील खासगी रूग्णवाहिका बंद करण्याचा निर्णय रूग्णवाहिका चालकांनी घेतला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी मध्यस्ती केल्यानंतर रूग्णवाहिका सेवा पुन्हा सुरळीत झाली आहे.
महाकाली म्बुलन्सचे मालक योगेश कोलगे यांना खेडमध्ये पोलिसांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याने त्यांनी म्बुलन्स सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. ही सेवा अत्यंत महत्वाची असल्याने तसेच कोलगे यांच्या ऍम्ब्युलन्स ताफ्यात कार्डियाक ऍम्ब्युलन्सही असल्याने ही सेवा बंद झाल्यास रुग्णांचे हाल होण्याची शक्यता होती. त्यामुळे डीवायएसपी श्री. ढवळे यांनी तात्काळ स्वतः कोलगे यांना फोन केला व वस्तुस्थिती समजून घेतली आणि कोलगे यांना सेवा सुरळीत चालू ठेवून रुग्णांना सहकार्य करण्याचे सांगितले. याबरोबरच रुग्णसेवा सुरु करीत असताना कोणतीही अडचण येणार नाही असेही स्पष्ट केले. यामुळे श्री. कोलगे यांनी डीवायएसपी श्री. ढवळे यांचे आभार मानून रूग्णवाहिका सेवा पूर्ववत चालू केली.
अत्यावश्यक सेवा देणार्यांनी सहकार्य करावे
सध्या पोलिसांवर प्रचंड ताण आहे पोलिस आपले काम प्रामाणिकपणे करीत आहेत मात्र काही बेजबाबदार लोक विविध कारणे सांगून रस्त्यावर येतात. त्यामुळे पोलीसही हैराण होत असल्याचे चित्र आहे. अशा लोकांवर कारवाई होत असतानाच कधीतरी इतरांवरही कारवाई होण्याची शक्यता असते मात्र अत्यावश्यक सेवेतील वाहनचालकांनीही पोलिसांना सहकार्य करून आपली ओळख आणि आपण कोणत्या कामासाठी बाहेर पडलो हे पटवून द्यावे जेणेकरून पोलिसांचेही काम सुलभ होईल.
नवनाथ ढवळे,उपविभागीय पोलिस अधिकारी चिपळूण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.