गुहागर (रत्नागिरी) : गुहागर गाणे खडपोलीतील निकृष्ट पोषण आहाराचा विषय समोर आल्यानंतरही गुहागर तालुक्यातील काही गावांमध्ये पोषण आहाराचे वाटप अंगणवाडी सेविकांनी केले. त्यामुळे भाजप आक्रमक झाला आहे. सोमवारी गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेवून हे वाटप तत्काळ थांबवावे. अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी केली. ही मागणी मान्य करत, गटविकास अधिकाऱ्यांनी वितरण थांबविण्याचे लेखी आदेश एकात्मिक महिला व बाल कल्याण कार्यालयला दिले आहेत.
10 जुलैला गाणे खडपोलीतील एका गोदामात सडलेले धान्य ठेवल्याचा प्रकार स्थानिक ग्रामस्थांनी उघडकीस आणला. तत्पूर्वी २ जुलैला निकृष्ट पोषण आहाराचे वितरण करुन नये. अशी मागणी भाजपने गटविकास अधिकाऱ्यांकडे केली होती. तरीही 11 जुलैला तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी पोषण आहाराचे वितरण केले. त्यावेळी सदर आहाराचे साहित्य खाण्यास योग्य आहे का याची तपासणी केल्यानंतर ते वापरात घ्यावे. अशा सूचना अंगणवाडी सेविकांनी पालकांना केल्या. काही महिला ग्रामस्थांनी पोषण आहार तपासला तेव्हा बुरशीसदृष्य रंगाच्या हरभऱ्यात काळे खडे आढळून आले.
डाळी आणि इतर जिन्नसामध्ये सुकलेल्या लेंड्या स्पष्टपणे दिसत होत्या. याची माहिती मिळताच भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. पुराव्यादाखल फोटो घेवून त्यांनी पंचायत समिती गाठली. त्यावेळी एकात्मिक बाल व महिला कल्याण कार्यालयातील लिपिक पवार यांनी आम्हाला वितरणाचे आदेश दिल्याने अंगणवाडी सेविकांना आहार वितरण करण्यास सांगितला. तालुक्यातील अन्य कोणाकडूनही तक्रार आलेली नाही. असे उत्तर दिले. त्यामुळे संतापलेल्या तालुकाध्यक्षांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे वितरीत झालेल्या पोषण आहाराचे फोटो दाखविले. समोर पुरावा दिसल्यानंतर तातडीने गटविकास अधिकाऱ्यांनी हा पोषण आहार वितरीत केला जावू नये असे लेखी आदेश दिले आहेत.
मंगळवार ( जुलै) पासून सर्व पर्यवेक्षकांनी बीटवर जावून अंगणवाडी सेविकांना वाटप झालेले धान्य परत घ्यावे. अशा सूचनांही गटविकास अधिकारी प्रकाश भोसले यांनी केल्या आहेत.गुहागर तालुका युवासेना अधिकारी अमरदिप परचुरे यांनी देखील निकृष्ट पोषण आहाराबाबतची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांना सांगितली. त्यावेळी निकृष्ट पोषण आहाराचे वितरण करु नये अशा सूचना जिल्हा परिषदेने दिल्या असल्याचे रोहन बने यांनी स्पष्ट केले. याची माहिती परचुरे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिली.
लॉकडाऊनमुळे रोजगार बुडाल्याने गोरगरीबांच्या घरातील मुलांना पोषक आहार मिळत नाही. त्यामुळे निकृष्ट दर्जाचा पोषण आहार परत घेण्याऐवजी उत्कृष्ट दर्जाचा पोषण आहाराचे लवकरात लवकर वितरण व्हावे. अशी आमची मागणी आहे.
सचिन ओक, सरचिटणीस, भाजप
संपादन - अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.