रत्नागिरी - नाईट लाईफबाबत विरोधकांकडून शब्दच्छल केला जात आहे. शिवसेना नेते आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची नाईट लाईफची संकल्पना वेगळी असून रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्यांना त्याचा फायदा मिळू शकतो, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री ऍड. अनिल परब यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - भंडारी श्री अन् स्ट्राॅग वुमनचे हे मानकरी
जिल्हा नियोजनच्या बैठकीसाठी पालकमंत्री अनिल परब सोमवारी (ता. 20) रत्नागिरीत आले होते. बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नाईट लाईफबाबत विचारले असता ते म्हणाले, मुंबईची जीवनशैली वेगळी आहे. रात्री उशिरापर्यंत येथील कामकाज सुरू असते. काही कारखाने रात्रीच्या वेळी सुरू असतात तेथील कामगारांसाठी हे नाईट लाईफ आहे. त्यांना रात्री कोणत्या गोष्टीची गरज लागली तर मॉल, हॉटेल्स किंवा तत्सम गोष्टी मिळणारी दुकाने सुरू राहिली पाहिजेत. मुंबईमध्ये रात्री वाहतूकही सुरू असते. परराज्यातून मुंबईत येणाऱ्या व्यक्तीला जेवण मिळाले पाहिजे. हे लक्षात घेऊन मुंबईत नाईट लाईफ सुरू राहावे, या उद्देशाने हा मुद्दा मांडण्यात आला होता; परंतु त्याचा विपर्यास केला जात आहे. विरोधक शब्दांमध्ये अडकून राहिले आहेत. त्याला राजकारणाचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
हेही वाचा - काय आहे कापडी पिशव्यांचा दोडामार्ग पॅटर्न ?
किमान समान कार्यक्रमावर आधारित तीन पक्षांचे सरकार सत्तेत आहे. आमच्यामध्ये नाईटलाईफवरुन मतभेद नाहीत, असे पालकमंत्री परब यांनी स्पष्टपणे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.