Anuskura Ghat esakal
कोकण

Anuskura Ghat : पश्‍चिम महाराष्ट्राशी जोडणारा अणुस्कुरा घाटातला प्रवास ठरतोय जीवघेणा; घाटमार्गात कोसळताहेत दरडी

राजेंद्र बाईत

धोकादायक दरडी, माती आणि दगड कोसळण्याच्या गेल्या काही वर्षातील घटनांची पुनरावृत्ती यावर्षीही होण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही.

राजापूर : रत्नागिरी जिल्ह्याला पश्‍चिम महाराष्ट्राशी जोडणारा ‘शॉर्टकट’ मार्ग म्हणून ओळखला जात असलेला अणुस्कुरा घाट (Anuskura Ghat) मार्गामध्ये गेल्या काही वर्षामध्ये पावसाळ्यात सातत्याने दरडी आणि माती कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातून, प्रवासाच्या दृष्टीने घाटमार्ग धोकादायक ठरत आहे.

घाटरस्त्यामध्ये दरडीसह माती अन् दगड कोसळल्यानंतर बांधकाम विभागाकडून (Construction Department) केल्या जाणार्‍या उपाययोजना तात्पुरत्या स्वरूपामध्ये ठरतात. त्यामुळे धोकादायक दरडी, अरूंद अन् धोकादायक वळणे, संभाव्य भूस्खलन, संरक्षण कठड्यांची आवश्यकता आदींच्या अनुषंगाने सर्व्हेक्षण होवून भविष्यामध्ये निर्धोक अणुस्कुरा घाटररस्ता तयार करण्यासाठी ‘मास्टर प्लॅन’ तयार करून त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

सुमारे नऊ कि.मी.चा असलेल्या तालुक्यातील अणुस्कूरा घाटमार्गाने कमी कालावधीमध्ये जा-ये करणे शक्य होत असल्याने अनेक वाहन चालकांकडून घाटमाथा-कोकण असा ये-जा करण्यासाठी या ‘शॉर्टकट मार्गाला’ अधिक पसंती दिली जाते. त्यातून या रस्त्यावरील वाहनांची वर्दळ मोठ्याप्रमाणात असते. नागमोड्या वळण्यांच्या या रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी उंचच्या डोंगर, उभ्या रषेतील दरडी, मोठमोठ्या दगडी ठिकठिकाणी कधीही खाली कोसळण्याच्या स्थितीमध्ये आहेत. गेल्या दोन-तीन वर्षामध्ये अतिवृष्टीच्या काळामध्ये धोकादायक दरडी, मोठमोठे दगड आणि माती पडून रस्ता काही काळापुरता बंद झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

घाटातील धोकादायक स्थितीमध्ये अद्यापही बदल झालेले नाहीत. त्यामुळे धोकादायक दरडी, माती आणि दगड कोसळण्याच्या गेल्या काही वर्षातील घटनांची पुनरावृत्ती यावर्षीही होण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही. घाटरस्त्यामध्ये दरडीसह माती अन् दगड कोसळल्यानंतर बांधकाम विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपामध्ये उपाययोजना केल्या जातात. मात्र, पुढीलवर्षी त्या पुन्हा फेल ठरतात.

या सर्व घटनांना नैसर्गिक कारणेमिमांसा असली तरी, सातत्याने होणार्‍या या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासह घाटरस्ता कायमस्वरूपी निर्धोक होण्यासाठी घाटरस्त्याचे परिपूर्ण आणि पूर्णपणे सर्व्हेक्षण होणे गरजेचे आहे. त्यामध्ये धोकादायक दरडी, अरूंद अन् धोकादायक वळणे, संभाव्य भूस्खलन, संरक्षण कठड्यांची आवश्यकता आदींच्या अनुषंगाने हे सर्व्हेक्षण होवून भविष्यामध्ये निर्धोक अणुस्कूरा घाटररस्ता तयार करण्यासाठी ‘मास्टर प्लॅन’ तयार करून त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

  • अणुस्कुरा घाटामुळे राजापूर तालुका घाटमाथ्याशी जोडला कमी कालावधीमध्ये

  • घाटमाथ्यावरील भागात जा-ये करणे सहज शक्य शॉर्टकट मार्ग म्हणून ओळख, चालकांचे मार्गाला प्राधान्य

  • आंबा घाटासह अन्य मार्ग बंद झाल्यास अवजड वाहतूकीसाठी पर्यायी मार्ग

  • नागमोड्या वळणांचा सुमारे नऊ कि.मी.चा मार्ग धोकादायक दरडी, उंच सुळके आणि माती अतिवृष्टीमध्ये कोसळण्याच्या वारंवार घटना

  • धोकादायक दरडी रोखण्यासाठी उपाययोजनांची गरज

“प्रवासाच्यादृष्टीने अणुस्कूरा घाट सुरक्षित रहावा यादृष्टीने बांधकाम विभागाकडून योग्य त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. घाटरस्त्याच्या डांबरीकरणाचेही काम झाले असून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत झालेला आहे. पावसाळ्यामध्ये घाटरस्त्यामध्ये आपत्ती ओढवल्यास आवश्यक ती यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहे.”

-स्वप्नील बावधनकर, कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT