कोकण

चिपळुणात घडामोडी : काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांना सेनेत घेण्याची जोरदार तयारी

मुझ्झफर खान

चिपळूण (रत्नागिरी) : काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव (Prashant Yadav)यांना शिवसेनेत (Shivsena)घेण्यासाठी सेनेतील नेत्यांनी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. चिपळूण तालुक्‍यात यादव यांच्या रूपाने स्वच्छ आणि नवा चेहरा देऊन तालुक्‍यात मागे पडलेल्या पक्षाला उभारी देण्यासाठी सेनेत नियोजन केले जात आहे. कोणाचे तरी खच्चीकरण करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश दिला जाणार असेल तर आहे तिथेच बरा आहे. पक्षातील सर्व गट एकत्र येणार असतील तरच मी शिवसेनेत येईन, अशी अट यादव यांनी शिवसेना नेत्यांसमोर ठेवल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

Army leaders efforts to get Congress taluka president Prashant Yadav in Shiv Sena kokan marathi news

काँग्रेसचे अध्यक्षपद हाती घेतल्यानंतर प्रशांत यादव यांनी चिपळूण तालुक्‍यातील संघटनेला बळकट करण्याचा प्रयत्न केला. आगामी निवडणुका स्वबळावर लढवणे आणि तालुका पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे मागितले होते. त्यांची ही मागणी पक्षातील जुन्या नेत्यांना खटकली. तालुकाध्यक्षांना अधिकार मिळाले तर आपले महत्त्व कमी होईल, या भीतीने कोकणातील काँग्रेस मुंबईतून चालवणाऱ्या नेत्यांनी आपले प्यादे यादव यांच्या विरोधात उभे केले आहे. या प्याद्यांकडून यादव यांच्या विरोधात पक्षनेतृत्वाकडे तक्रारी सुरू झाल्या आहेत. तालुकाध्यक्षांना डावलून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या केल्या जात आहेत तसेच पक्षाच्या कार्यक्रमांनाही त्यांना निमंत्रण दिले जात नाही. त्यांना तालुकाध्यक्षपदावरून हटवण्यासाठी त्यांच्या विरोधात तक्रारी सुरू झाल्या आहेत.

यादव यांना तालुकाध्यक्ष पदावरून हटवले गेले तर त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला तेव्हापासून तालुक्‍यातील शिवसेनेत मरगळ आली आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची महाविकास आघाडी झाल्यानंतर शिवसेनेचे तालुक्‍यातील काही नेते राष्ट्रवादीच्या आमदाराला डोंगळासारखे चिटकले आहेत. राष्ट्रवादीच्या इशाऱ्यावर चिपळुणातील शिवसेना चालत असल्याचे चित्र असताना सेनेचा सामान्य कार्यकर्ता मात्र दुर्लक्षित आहे.

कार्यकर्ते स्वीकारण्यास तयार नाहीत

चिपळूण तालुक्‍याचे नेतृत्व करू इच्छिणाऱ्या पक्षातील नेत्यांपैकी काहींना कार्यकर्ते स्वीकारण्यास तयार नाहीत. लोकप्रिय आहेत त्यांना कार्यकर्त्यांचा विरोध आहे. त्यामुळे पर्याय म्हणून प्रशांत यादव यांना पक्षात घेऊन त्यांच्याकडे तालुक्‍याचे नेतृत्व सोपवण्याचे नियोजन सुरू आहे.

शिवसेनेत जाण्याबाबत अद्याप माझा कोणताही विचार नाही. मी अजून काँग्रेसचा तालुकाध्यक्ष आहे. तालुकापातळीवरील कोणतीही निवड करताना किंवा कार्यक्रम घेताना मला विश्‍वासात घेतले जात नाही. काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून सूचना येईल त्याप्रमाणे माझी वाटचाल असेल.

- प्रशांत यादव, तालुकाध्यक्ष काँग्रेस चिपळूण

Army leaders efforts to get Congress taluka president Prashant Yadav in Shiv Sena kokan marathi news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction नंतरचे सर्व १० संघ; कोणाकडे सर्वात जास्त खेळाडू, तर कोणाकडे किती उरले पैसे; पाहा एका क्लिकवर

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

MLA Rohit Pawar : आपले उद्योग गुजरातला, तेथील ईव्हीएम महाराष्ट्रात

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

SCROLL FOR NEXT