ashtavinayak pilgrimage site Ballaleshwar temple became high-tech pali marathi news sakal
कोकण

Ballaleshwar Pali : अष्टविनायक तीर्थक्षेत्र बल्लाळेश्वर देवस्थान झाले हायटेक

भक्त निवास वेबसाईट सौरऊर्जा प्रकल्पांचे उद्घाटन; विशेष व्यक्तींचा सत्कार

अमित गवळे - सकाळ वृत्तसेवा

पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र पैकी एक पाली येथील श्री बल्लाळेश्वर देवस्थानच्या भक्तनिवास दोन इमारतीचे, नवीन वेबसाईट तसेच सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा नुकताच भक्तनिवास दोनच्या प्रांगणात प्रमुख अतिथी धर्मादाय अलिबाग प्रताप सातव, बल्लाळेश्वर देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र गद्रे याचे अध्यक्षतेखाली आणि सर्व विश्वस्त मंडळाचे उपस्थितीत मोठ्या जल्लोषात पार पडला.

श्री बल्लाळेश्वर देवस्थानने भाविकांच्या निवासाच्या सोयीसाठी भक्तनिवास बांधलेले आहेत. त्यातील भक्तनिवास क्रमांक २ या इमारतीचे नूतनीकरण नुकतेच करण्यात आले आहे. भक्तगणांची सेवा म्हणून विविध अत्याधुनिक आवश्यक सुविधा देखील यामध्ये निर्माण केलेल्या आहेत.

तसेच देवस्थानची माहिती जगभरात व्हावी व त्याद्वारे देवस्थानच्या माध्यमातून समाजाचा सर्वांगीण विकास केला जावा या उद्देशाने सर्व सुविधायुक्त नवीन वेबसाईटची निर्मिती देखील करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण भक्त निवासासाठी सौर ऊर्जा, प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी देवस्थानच्या विकासाचे कृतीशील साक्षीदार जेष्ठ मंडळींचा आणि देवस्थानच्या कर्मचारी वर्गामध्ये उत्कृष्ठ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आल्याचे अध्यक्ष जितेंद्र गद्रे यांनी सांगितले.

या उद्घाटन सोहळ्यास स्वरूप पाटील, चैतन्य कर्णिक, ययाती गांधी, अभिजीत कुंटे ,मिलिंद भावे, भाजपा उपाध्यक्ष राजेश मापारा, उपनगराध्यक्ष आरिफ मनियार, नगरसेवक पराग मेहता आदीसह अष्टविनायक देवस्थान पैकी ओझर, चिंचवड, रांजणगाव, महड येथील प्रतिनिधी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सदर उद्घाटन सोहळा यशस्वी करण्याकरिता देवस्थानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व विश्वस्त मंडळ आणि कर्मचारी वर्गांनी विशेष मेहनत घेतली.

देवस्थानचे पुढील व्हिजन

सर्व भाविकांना जागतिक दर्जाच्या उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करून देणे. व मंदिराच्या माध्यमातून समाजाचा सर्वागिण विकास करणे.

तीन एस म्हणजे

1) सेवा

2) स्वच्छता

3) सुरक्षा

  • समाजात आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे व आरोग्यविषयक सोयी सुविधांकरीता करीता ठोस व्यवस्था करणे.

  • उच्च दर्जाच्या अॅकॅडेमिक, शैक्षणिक, वैदिक, अध्यात्मिक, सुविधा निर्माण करणे.

  • पर्यावरणातील पारंपारीक उर्जा स्त्रोतांचा वापर करणे व द्रवरूप व घनरूप उत्सर्जनाचे योग्य व्यवस्थापन करणे.

  • विश्वास, पारदर्शकता, सेवाभाव, समर्पण, सोधेपणा यांचा अवलंब करणे.

  • श्री बल्लाळेश्वर थीम पार्कची निर्मीती करणे.

  • आबा नदीवर जॅकवेल बांधुन देवस्थानासाठी पाणीपुरवठा योजना.

  • सीवेज ट्रीटमेंट एसटीपी प्लॅट तयार करणे .

  • पेशंट केअर सेंटर अत्यावस्थ व वयोवृध्द, व गरजू पेषंटची व्यवसथा करणे.

  • भाविकांसाठी भक्तनिवास क्र. 3 व 4 ईमारतींची निर्मीती करणे. वरील प्रमाणे देवस्थाने नवीन व्हिजन असल्याचे अध्यक्ष जितेंद्र गद्रे यांनी सांगितले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT