Baby whale stuck on Ganapatipule beach in Ratnagiri Successfully rescued to deep sea  
कोकण

Blue Whale : अखेर व्हेल माशाचं पिल्लू सुखरुप समुद्रात परतलं; 'असं' चाललं रेस्क्यू ऑपरेशन

रोहित कणसे

रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथील समुद्र किनाऱ्यावर एक व्हेल माशाचं पिल्लू वाहून आल्याचा प्रकार समोर आला. जीवंत राहण्याची या पिल्लाची धडपड मागील सुमारे दोन दिवसांपासून सुरू होती. समुद्रातील ओहोटीमुळे हे पिल्लू समुद्र किनाऱ्यावरील वाळूत रुतून बसलं होतं.

अखेर त्याला वाचवण्यासाठी स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांना यश आलं. अखेर जवळपास दोन दिवसांच्या मेहनतीनंतर या व्हेल माशाच्या पिल्लाला समुद्रात सोडण्यात यश आलं आहे. समुद्र किनाऱ्यापासून अंदाजे चार ते पाच किमी आत या पिलाला सोडण्यात आले. समुद्रातील ओहोटीमुळे हे व्हेल माशाचं पिल्लू समूद्राच्या किनाऱ्यावर अडकून पडलं होतं.

या माशाचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे व्हेल माशाचं पिल्लू पाहण्यासाठी पर्यटक आणि स्थानिकांनी येथे मोठी गर्दी केली होती. या दरम्यान पिल्लाला समुद्रात सुखरूप सोडण्यासाठी किनाऱ्यावर आलेले पर्यटक, स्थानिक नागरिक तसेच एक्सपर्ट, एमटीडीसीचे अधिकारी, वनविभागाचे अधिकारी यांच्या मदतीने प्रयत्न केले जात होते.

महत्वाचे म्हणजे या व्हेल माशाच्या पिल्लाचं वजन सुमारे ४ ते सहा टनापर्यंत आणि लांबी २० फूट होती. समुद्राला ओहोटी असल्यामुळे या पिल्लाला समुद्रात सोडण्यात काही अडचणी येत होत्या. अखेर या पिल्लाला एका बोटीतून दोर टाकून खोल समुद्रात सोडण्यात आलं. हे पिल्लू किनाऱ्यावर आल्यापासून त्याची जगण्यासाठी धडपड सुरू होती. अखेर ते त्याच्या मुळ अधिवासात परतल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

मतदान कर्मचाऱ्यांना यंदा भत्ता मिळणार ऑनलाईन! ट्रायल पेमेंटसाठी आज 1 रुपया पाठवला जाईल; बॅंक खात्यांची होईल खात्री अन्‌ बुधवारपासून उर्वरित रक्कम मिळणार

SCROLL FOR NEXT