Bad condition of bus stand at Talere 
कोकण

परिवहन मंत्र्यांच्या गावचं बसस्थानक मॉडर्न कधी होणार?

नेत्रा पावसकर

नांदगाव (सिंधुदुर्ग) - कणकवली, देवगड व वैभववाडी अशा तीन तालुक्‍यातील अनेक गावांना जोडणारे महत्त्वाचे ठिकाण असलेले तळेरे बसस्थानक अजूनही दुर्लक्षित राहिले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर वसलेल्या तळेरे बसस्थानकाचा समावेश राज्यातील मॉर्डन बसस्थानक यादीत समावेश झाला होता; मात्र अजूनही बसस्थानक विकासाच्या काहीच हालचाली झाल्या नाहीत. आता याच तालुक्‍यातील परिवहन मंत्री आहेत. निदान त्यांच्या कारकिर्दीत तरी तळेरे बसस्थानक मॉडर्न बसस्थानक झालेले दिसेल का? असा प्रश्‍न तळेरे पंचक्रोशीतील प्रवाशांना पडला आहे. 

जिल्ह्यातील तालुका निर्मितीकडे वाटचाल करणारे तळेरे गाव मुंबई-गोवा महामार्ग व कोल्हापूर-विजयदुर्ग राज्य मार्गावर प्राईम लोकेशन असताना येथिल एसटी महामंडळाचे बसस्थानक राज्यातील मॉडेल बसस्थानक होणार असल्याची घोषणा 7 वर्षांपूर्वी राज्य शासनाने केली होती; मात्र आजही तळेरे बसस्थानक कोणतेही मॉडेल बनू शकले नसून समस्येच्या गर्तेत अडकलेले दिसत आहे. राज्यातील 12 बसस्थानकांचे मॉडेल बसस्थानकात रुपांतर करण्याची घोषणा त्यावेळी झाली होती; मात्र जिल्ह्यातील तळेरे मॉडेल स्थानकांचे स्वप्नच राहिले आहे. 

सध्या कणकवली तालुक्‍यातील हरकुळ गावचे सुपुत्र अनिल परब राज्याचे परीवहन मंत्री असल्याने ते तळेरे बसस्थानकाचे मॉडेल बसस्थानकाचे स्वप्न पूर्ण करतील का? अशा आशा पल्लवीत झाल्या आहेत; मात्र यासाठी पालकमंत्री, खासदार, आमदार व स्थानिक लोकप्रतिनीधींनी पाठपुरावा करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील अनेक बसस्थानकांचे नुतनीकरण करण्यात आले. यामध्ये खारेपाटण बसस्थानक सुसज्ज झाले. वैभववाडी एसटी बस्थानकांचाही प्रश्‍न मार्गी लागला.

त्यात सिंधुदुर्गनगरी नवीन बसस्थानक सुरु झाले तर कुडाळ व मालवण बसस्थानकाचे काम प्रगतीपथावर आहे. त्यात कणकवली बसस्थानाकांचे रुपडे पालटण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत; मात्र गेली सात वर्षे राज्य शासनाने अग्रक्रम देऊन होऊ घातलेल्या 12 मॉडेल बसस्थानकातील तळेरे बसस्थानक आजही विकासाच्या प्रतिक्षेत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, गोवा, बेळगाव आदी भागात दीडशेहून अधिक बस फेऱ्या तळेरे बसस्थानकातून सुटतात त्यात मुंबई-गोवा महामार्ग व विजयदुर्ग-कोल्हापूर राज्यमार्ग अशा महत्त्वाच्या मार्गावर असणाऱ्या या बसस्थांनकातून दररोज अनेक प्रवासी प्रवास करत आहेत. 

तत्कालीन आमदार प्रमोद जठार यांनी तळेरे बसस्थानक सुसज्ज व सुशोभिकरण व्हावे, यासाठी प्रयत्न केले होते. यानतंर 2013 ला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील 12 बसस्थानकांचे मॉडेल बसस्थानक म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला होता.

यामध्ये जिल्ह्यातून तळेरे या शिवाय औरंगाबाद, नाशिक महामार्ग, कराड, अहमदनगर-मैलवाडा, रत्नागिरी, बीड, महाड, अहमदनगर-श्रीरामपूर, पूणे-शिरुर, वर्धा-आर्वी, उस्मानाबाद-करमाळा या स्थानकांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर महामंडळाने 16 सल्लागार संस्थांकडून डिझाईन मागवली होती. यातही काही बसस्थांनकांची कामेही सुरू झाली; मात्र तळेरे बसस्थानक मॉडेल बसस्थानकाचे काम आजही भिजत घोंगडे पडले आहे. त्यानंतर सत्ता बदल झाल्याने याचाही फटका तळेरे बसस्थानकाला बसला. त्याचबरोबर राजकीय कुरघोडीही झाल्या; मात्र त्यातही परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याशी पाठपुरावा करुन आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ, सिंधुदुर्गनगरी, मालवण या बसस्थानकांना निधी आणला; मात्र शासनाच्या यादीत मॉडेल स्थानक असलेल्या तळेरे बसस्थानकाला आजही निधी मिळत नाही, हे दुर्दैवच म्हणावं लागेल. 

जिल्ह्याच्या प्राईम लोकेशनवर असलेले तळेरे बसस्थानक कणकवली, देवगड, वैभववाडी या तीन तालुक्‍यातील अनेक गावांना जोडणारे महत्त्वाचे स्थानक आहे. या परिसरातील तीसहून अधिक गावातून आठवडी बाजार व विविध कामानिमित्ताने या भागातील 85 टक्के नागरिक हे या स्थानकावर अवलंबून आहेत. तळेरे परिसराचा वाढता विस्तार पाहता शहराकडे वाटचाल सुरु आहे. त्यात शासनाने तालुका निर्मिती करावी, अशी मागणीही येथील नागरिक करीत आहेत. 

आता कागदोपत्री, प्रत्यक्षात कधी? 
दिवाळी, गणेशोत्सवात व मेमध्ये या बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते; मात्र अपुऱ्या सुविधेमुळे प्रवाशांचे हाल होतात. बसस्थानक विविध मूलभूत समस्यांनी ग्रासल्याने प्रवाशांची परवड होते. तळेरे बसस्थानक मॉडेल बसस्थानक व्हावे, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले गेले; मात्र प्रत्यक्षात पाठपुरावा झाला नाही. राज्यकर्ते व विरोधक शहरातील स्थानकाची पाहणी करतात; मात्र तळेरेसारख्या प्राईम लोकशन असणाऱ्या बसस्थानकाची पाहणी करण्यास त्यांना वेळ नाही. गेली सात वर्षे मॉडेल स्थानक म्हणून कागदोपत्री नाव असलेल्या तळेरे बसस्थानकाचा परिसर, जागा व सुविधा उपलब्ध आहेत; मात्र दूरदृष्टी अभावी रखडले आहे. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Byculla Assembly Election: भायखळ्यात कोण मारणार बाजी? दोन शिवसेनेत काटे की टक्कर!

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Women’s Health Tips : गर्भाशयाचा आजार असेल तर शरीरात दिसतात ही लक्षणं, अनेक महिला करतात दुर्लक्ष

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

SCROLL FOR NEXT