Bahadur Shaikh Naka Flyover Girder Collapse esakal
कोकण

Chiplun Accident : मोठी दुर्घटना टळली, पण..; उड्डाणपुलाचे 25 गर्डर तुटून तब्बल 15 कोटींचं नुकसान, नेमकं काय घडलं?

उड्डाणपुलाच्या दोन पिलरमध्ये १५ गर्डर बसवले जातात.

सकाळ डिजिटल टीम

या अपघातात (Road Accident) लॉंचर आणि २५ गर्डर तुटून सुमारे १५ कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

चिपळूण : बहादूरशेख नाका (Bahadur Shaikh Naka) येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामातील ३० गर्डर सोमवारी दुपारी पावणेतीन वाजता काही क्षणातच खाली कोसळले. या अपघातात (Road Accident) लॉंचर आणि २५ गर्डर तुटून सुमारे १५ कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

उड्डाणपुलाच्या दोन पिलरमध्ये १५ गर्डर बसवले जातात. बहादूरशेखनाका येथील मुख्य चौकातच गर्डर बसविण्याचे काम सुरू असताना अपघात झाल्याने त्याची खबरदारी ठेकेदार व महामार्ग विभागाने घेतली होती. कऱ्हाडकडे जाणारी वाहने बहादूरशेख नाक्याच्या वाशिष्ठी पुलापर्यंत जाऊन तेथून वळवली जात होती.

नागरिकांची हानी टाळण्यासाठी खबरदारी घेतली तरी सोमवारी लॉंचर आणि गर्डरचे मोठे नुकसान टाळता आले नाही. उड्डाणपुलाचे गर्डर हायड्रोलिक सिस्टीमने बसविण्यासाठी लॉंचरचा उपयोग केला जातो. या लॉंचरची किंमत सुमारे साडेतीन कोटी आहे. अपघातात लॉंचर मधोमध तुटला आहे. तसेच २५ गर्डर पूर्णपणे तुटले आहेत. साधारणत: एका गर्डरसाठी ८० टन लोखंड वापरले जाते.

आज बाजारात ७० रुपये किलो दराने स्टीलची विक्री सुरू आहे. सिमेंट आणि इतर साहित्य मिळून एका गर्डरसाठी ७० लाखांचा खर्च येतो. लॉंचरसह २५ गर्डरचे सुमारे १५ कोटींचे नुकसान झाले. याबाबत ईगल कंपनीचे जनसंपर्क अधिकारी जयंतीलाल नानेचा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘गर्डर बांधणीच्या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा झालेला नाही. प्रत्येक ब्लॉकला दोन्ही बाजूने हायड्रोलिक टेन्शन लावून आठ ते दहा तास तपासणी केली जाते. महामार्गावरून रोज जेवढी वाहने जातात, त्याच्या पाचपट लोड देऊन उड्डाणपुलाची तपासणी वारंवार केली जाते.

अशा पद्धतीने या कामाची गुणवत्ता तपासली जाते. आजही त्याच पद्धतीने गुणवत्ता तपासणीचे काम सुरू असताना दोन गर्डर मधोमध खचले. ते दोन गर्डर सुलभपद्धतीने खाली घेऊन त्या जागी नवीन गर्डर बसवण्याचे नियोजन आम्ही केले होते. त्याच दरम्यान हा अपघात झाला. खचलेल्या दोन पिलरच्या मध्यभागी मोठा गॅप निर्माण झाला होता. त्याच्यामुळे लॉंचरवर ताण येऊन लॉंचरसह गर्डर कोसळले.

उड्डाणपूल उभारणीचे काम ईगल कंपनीमार्फत सुरू आहे. ईगलच्या एकूण कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करण्यासाठी स्वतंत्र कन्सलटन्सी नेमलेली आहे. आजच्या घटनेची चौकशी केली जाईल. यापुढे खबरदारी घेताना उड्डाणपुलाच्या डिझाईनमध्ये दुरुस्ती केली पाहिजे का, अन्य कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे, याचा प्रथम अभ्यास केला जाईल. त्यासाठी ईगल व थर्डपार्टी ऑडिट करणाऱ्या कन्सलटन्सी कंपनीला समोरासमोर घेऊन चर्चा करणार आहोत. घटनेचा अहवाल वरिष्ठांना दिला जाईल.

-राजेंद्र कुलकर्णी, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, चिपळूण

दोन पिलरच्या मध्यभागी निर्माण झालेला गॅप चार दिवसांपासून दिसत होता. हे आम्हाला कळले. मग ठेकेदार कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना का कळले नाही. चार दिवसांपूर्वीच घटनेचे गांभीर्य ओळखले असते तर आजची घटना घडली नसती.

-संतोष होळकर, चिपळूण

चिपळूणमधील तथाकथित सर्व पक्षांचे पदाधिकारी आणि सर्व आमदार, खासदारांनी राजापूरपासून सिंधुदुर्गमधील हायवेचे काम बघून यावे. तिकडे महामार्गाचे काम मार्गी लागले आहे आणि कामदेखील दर्जेदार आहे. ते काम कोणामुळे झाले यावर चर्चा झाली पाहिजे. सिंधुदुर्गात झाले ते रत्नागिरी जिल्ह्यात का होत नाही.

-संजय चव्हाण, कर सल्लागार, चिपळूण

चिपळुणात फ्लाय ओव्हरची ही अवस्था, त्याचा दर्जा हा मोठा प्रश्‍न आहे. चिपळूणचा उड्डाणपूल फायद्याचा की तोट्याचा या विषयावर खुली चर्चा होणे आवश्यक आहे.

-शहानवाज शाह, वास्तू विशारदतज्ज्ञ, चिपळूण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT