Bahadur Shaikh Naka Flyover Girder Collapse Chiplun esakal
कोकण

आमदाराच्या पाहणी दौऱ्यावेळीच धमाका; उड्डाणपुलाचे 30 गर्डर खाली कोसळले, भूकंपासारखा आवाज झाल्याने नागरिकांची पळापळ

बहादूरशेख नाका ते युनायटेड इंग्लिश स्कूलपर्यंत उड्डाणपूल बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

आमदार शेखर निकम पदाधिकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून अपघाताची पाहणी करीत असतानाच दोन पिलरमधील ३० गर्डर लाँचरसह काही क्षणातच कोसळले.

चिपळूण : शहरातील बहादूरशेख नाका (Bahadur Shaikh Naka) येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे गर्डर सकाळी (सोमवार) आठ वाजता मधोमध खचले. दुपारी पावणेतीन वाजता दोन स्पॅनमधील ३० गर्डर लॉंचरसह कोसळले. भूकंपासारखा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांची पळापळ झाली.

सुदैवाने या अपघातात (Road Accident) कोणतीही जीवितहानी झाली नाही. दोन पिलर मधोमध खचल्यानंतर ज्या उपाययोजना करणे गरजेचे होते, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने हा अपघात झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. बहादूरशेख नाका ते युनायटेड इंग्लिश स्कूलपर्यंत उड्डाणपूल बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

महामार्गाच्या चौपदरीकरणातील हा सुमारे १.८१ किलोमीटर लांबीचा सर्वाधिक मोठा उड्डाणपूल आहे. त्यासाठी ४६ पिलर उभारले आहेत. आठ महिन्यांपासून उड्डाणपूल उभारणीचे काम सुरू आहे. हे काम तांत्रिकदृष्ट्या अत्यंत जोखमीचे असल्यामुळे गर्डर बसविण्यासाठी बराचसा कालावधी घेतला. नव्याने चढवलेले गर्डर सकाळी ८ वाजता मधोमध खचून कॉंक्रिटचा काही भाग खाली कोसळला. मोठा आवाज झाल्याने नागरिकांची पळापळ झाली. त्याकडे दुर्लक्ष झाले.

काल दुपारी खचलेले गर्डर पाहण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची बहादूरशेख नाका परिसरात गर्दी होती. त्याचवेळी हे गर्डर कोसळले. त्यानंतर बहादूरशेख नाका परिसरात वाहतूक कोंडी झाली. निकृष्ट कामावरून लोक अधिकाऱ्यांसमोर आपला संताप व्यक्त करीत होते. त्याच दरम्यान पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी प्रथम गर्दी कमी केली. प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे आदींनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

पत्र्याच्या ड्रमवरून उड्या

आमदार शेखर निकम पदाधिकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून अपघाताची पाहणी करीत असतानाच दोन पिलरमधील ३० गर्डर लाँचरसह काही क्षणातच कोसळले. गर्डर कोसळण्याची चाहूल लागताच आमदार निकम व त्यांच्या सहकाऱ्यांनी व नागरिकांनी पत्र्याच्या ड्रमवरून उड्या टाकत जीव वाचवला. या घटनेत आमदार निकम यांच्यासह सहा ते सात जणांना किरकोळ दुखापत झाली.

उड्डाणपुलाचे गर्डर कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ तेथील अभियंत्यांशी चर्चा केली. तेव्हा त्यांनी ही घटना घडण्याचे कारण तांत्रिक असल्याचे सांगितले. याबाबत भारत सरकारच्या एजन्सीद्वारे चौकशी केली जाईल. त्यामध्ये कारणे शोधली जाणार आहेत. तशा लेखी आणि तोंडी सूचना एजन्सीला दिल्या आहेत. त्यांच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.

- एम. देवेंदर सिंह, जिल्हाधिकारी

वाहतूक वळवली

कऱ्हाडकडे जाणारी वाहतूक गुरुकुल कॉलेजमार्गे मच्छी मार्केट येथून वळविण्यात आली. मुंबईकडे जाणारी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत या ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी घटनास्थळाची पाहणी करीत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT