Refinery Project Updates | Konkan News esakal
कोकण

कोकणात रिफायनरीला थारा नाही; प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध कायम

रिफायनरी विरोधात पुन्हा एकदा राजापुरातील तहसिल कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोकणातील रिफायनरी प्रकल्प नाणार येथे करण्याला स्थानिकांचा विरोध आहे. कोकणतील रिफायनरीसाठी स्थानिकांशी चर्चा करून त्यांचं म्हणणं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत (Uddhav Thackeray) पोहचवणार आहे. चांगला प्रकल्प येत असेल तर त्याचं स्वागत आहे. यासाठी लोकांना विश्वासात घेऊन पुढे जाणार असल्याचं वक्तव्यही मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackray) यांनी केलं आहे. दरम्यान, आता नाणार ऐवजी रत्नागिरीतील बारसू येथे हा प्रकल्प होणार असल्याचं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहलं आहे. त्यामुळे आता रिफायनरी विरोधात पुन्हा एकदा राजापुरातील तहसिल कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे.

यावेळी बारसु येथे हा प्रकल्प होण्याला राजापूर येथील स्थानिकांनी याला विरोध केला असून यासाठी त्यांनी तहसिलद कार्यालयावर मोर्चा काढला आहे. कोकणात रिफायनरीला थारा नाही असं म्हणतं त्यांनी रिफायनरीला विरोध दर्शवला आहे. पारंपारिक गाणी आणि वाद्यांच्या सहाय्यानं या स्थानिकांनी येथे विरोध नोंदवला आहे. आमच्या गावात रिफायनरी नको आहे. कारण यामुळे कोकणातील निसर्गाचे नुकसान होणार आहे. आम्हाला कोकणात आणि या गावांत हा प्रकल्प नको अशी ठाम भूमिका येथील ग्रामस्थांनी घेतली आहे. कोणतीही मोठी उलाढाल होऊदे, अगर रोजगार मिळुदे काहीही झालं तरी गावात रिफायनरी येऊ देणार नाही असंही येथील स्थानिकांनी स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी काय लिहलंय या पत्रात

नाणार रिफायनरीला (Nanar Refinery) स्थानिकांचा विरोधात आहे. यामुळे नाणार ऐवजी आता रिफायनरीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरच्या बारसू सालेगाव आणि पश्चिम भागातील गावातील काही गावांचा समावेश आहे. बारसू रिफायनरीसाठी जवळपास १४ हजार एकर जमीन आणि बंदरासाठी जवळपास २४१४ एक जागा देण्याची तयारी महाराष्ट्र सरकारने दर्शवल्याचं सांगण्यात येत आहे. रिफायनरी प्रकल्प हा रत्नागिरीतच (Ratnagiri) होणार हे जवळपास निश्चित झालं असल्याचं सांगितलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT