कोकण

वीर सावरकरांचे विचार आत्मसात करण्याची गरज - राज्यपाल कोश्यारी

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांनुसार जातीव्यवस्थेचे उच्चाटन होणे ही राष्ट्र निर्माणासाठी अत्यंत गरजेची बाब आहे.

- मकरंद पटवर्धन

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांनुसार जातीव्यवस्थेचे उच्चाटन होणे ही राष्ट्र निर्माणासाठी अत्यंत गरजेची बाब आहे.

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भारत राष्ट्र, भारतातील जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी केलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांनुसार जातीव्यवस्थेचे उच्चाटन होणे ही राष्ट्र निर्माणासाठी अत्यंत गरजेची बाब आहे. आज देशाला स्वा. सावरकरांच्या विचारांची आवश्यकता असून, नव्या पिढीने त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी येथे केले.

नवी दिल्लीच्या भारतीय इतिहास संशोधन परिषदेने (आयसीएचआर) गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाअंतर्गत आयसीएचआरने स्वा. सावरकर यांच्यावरील डिसमॅंटलिंग कास्टिझम-लेसन्स फ्रॉम सावरकर्स इसेन्शिअल्स ऑफ हिंदुत्व या विषयावरील ही परिषद आहे. परिषदेचे उद्घाटन राज्यपाल कोश्यारी यांनी केले.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, गावांमध्ये अस्पृश्यता पाळली जाते. भारतातून ही जातीयता जेव्हा नष्ट होईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने समाज, राष्ट्र सुस्थिर होईल. भारतीय जातीव्यवस्था, अस्पृश्यता निर्मूलनासाठी स्वा. सावरकर यांनी रत्नागिरीत केलेली कार्ये अत्यंत महत्वाची आणि गौरवपूर्ण आहेत. स्वा. सावरकर यांची कर्मभूमी असलेल्या रत्नागिरीत ही राष्ट्रीय परिषद होत आहे, ही उल्लेखनीय गोष्ट आहे. स्वा. सावरकर हे सामाजिक समतेचे मोठे पुरस्कर्ते होते.

कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रगीत, सरस्वती वंदना, स्वा. सावरकरांच्या पुतळ्याचे पूजन आणि दीप्रज्वलनाने झाली. व्यासपीठावर गुरू घासीदास विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रा. अशोक मोडक, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रा. रजनीश कुमार शुक्ला, बीजभाषक केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर, मुंबईच्या स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे रणजित सावरकर आयसीएचआरचे सदस्य सचिव तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. कुमार रत्नम, परिषदेचे समन्वयक आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्रा. उमेश कदम आदी उपस्थित होते. प्रा. उमेश कदम यांनी परिषदेची संकल्पना, स्वा. सावरकरांचे विचार आणि कार्य समजून घेण्याची आवश्यकता विशद केली.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, प्रा. हिमांशु चतुर्वेदी, डॉ. नीरज श्याम देव, अक्षय जोग, र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, सचिव सतीश शेवडे यांच्यासह सावरकरप्रेमी उपस्थित होते. सूत्रसंचालन आयसीएचआरच्या सहाय्यक संचालक डॉ. नुपूर सिंग यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Latest Marathi News Updates live : लाडक्या बहिणींना आता महिन्याला 2100 रुपये मिळणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT