गणपतीपुळे हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणी दाखल होतात. यंदा लोकसभा निवडणुकांकडून हंगाम उशिराने सुरू झाला होता.
रत्नागिरी : पावसाचे संकेत मिळाल्यानंतर समुद्राच्या लाटांचा वेगही वाढला आहे. त्यामुळे गणपतीपुळे (Ganpatipule Beach) येथील सुलभ शौचालयासमोर चाळ (वाळूत खड्डा) तयार झाला आहे. पर्यटकांची अजूनही किनारी भागात गर्दी असल्यामुळे धोकादायक परिसरात पोहण्यास मनाई करणे आवश्यक आहे. रविवारी (ता. २) या ठिकाणी एकाचा बुडून मृत्यू झाल्यामुळे तिथे प्रशासनाकडून लक्ष देणे आवश्यक आहे.
गणपतीपुळे हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणी दाखल होतात. यंदा लोकसभा निवडणुकांकडून हंगाम उशिराने सुरू झाला होता. अजूनही पर्यटकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. दरदिवशी दहा हजार पर्यटक किनारी भागात भेटी देतात. २६ मे रोजी जलपर्यटनाला शासनाने बंदी घातली त्यामुळे वॉटर स्पोर्टस् बंद झाले. त्यानंतर समुद्रस्नान करणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेची भिस्त जीवरक्षकांवरच होती; मात्र दुर्घटना टाळण्यात सर्वांनाच यश आले.
गेल्या चार दिवसांत वातावरणात झालेल्या बदलांमुळे किनारी भागात मान्सूनचे संकेत मिळू लागले आहेत. समुद्राच्या लाटांचा वेग वाढला आहे. भरतीच्यावेळी किनारी भागात संरक्षक भिंतीच्या जवळ लाटा येऊन आदळत आहेत. या परिस्थितीमध्येही पर्यटक समुद्रस्नानाला उतरत आहेत. रविवारी पर्यटकांची गर्दी होती. पावसाचे संकेत मिळाल्यानंतर समुद्राच्या लाटांचा वेगही वाढला आहे. त्यामुळे गणपतीपुळे येथील सुलभ शौचालयासमोर चाळ तयार झाला आहे. तिथे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडूनही पावले उचलणे आवश्यक आहे.
गणपतीपुळे किनारी चाळ (वाळूत खड्डा) तयार होण्याची परिस्थिती यंदा थोडी उशिराने झाली आहे. रोहिणी नक्षत्राच्या मुहुर्तावर पाऊस पडल्यानंतर चाळ तयार होतो. समुद्रातील प्रवाहानुसार चाळ तयार होण्याची जागा बदलत असते. त्याप्रमाणे सुरक्षितता बाळगली पाहिजे.
-डॉ. विवेक भिडे, गणपतीपुळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.