Karul Ghat Sindhudurg Vaibhavwadi Police esakal
कोकण

Karul Ghat : बंदी असतानाही पोलिसांनी वाहने सोडल्यामुळे करूळ घाटात मोठी कोंडी; तब्बल तीन तास वाहतूक ठप्प

गनबावडा पोलिसांनी वाहने न थांबविल्यामुळे करूळ घाटात वाहतुकीची कोंडी झाली.

सकाळ डिजिटल टीम

मनस्ताप सहन करावा लागल्यामुळे वाहनचालकांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर टीका केली.

वैभववाडी : बंदी असतानाही गगनबावडा पोलिसांनी (Gaganbawda Police) वाहने सोडल्यामुळे करूळ घाटात (Karul Ghat) वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली. अवघ्या दहा किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी वाहनचालकांना तीन तास लागले. पोलिसांनी काही वाहने वैभववाडी-करूळ मार्गालगत उभी करून वाहतूक सुरळीत केली.

गणेशोत्सवात होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी जिल्ह्यातील १८ ते २० सप्टेंबर रात्री दहा वाजेपर्यंत अवजड वाहतुकीला बंदी केली आहे. याशिवाय २३ ते २४ सप्टेंबर या कालावधीत बंदीचा आदेश आहे. सिंधुदुर्ग पोलिसांनी प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या आदेशाचे तंतोतंत पालन केले.

मात्र, गगनबावडा पोलिसांनी आदेशाचे पालन न केल्यामुळे करूळ घाटात वाहतुकीच्या कोंडीला वाहनचालकांना सामोरे जावे लागले. १८ तारखेपासून बंदी असताना कोल्हापूरहून सिंधुदुर्गच्या दिशेने येणारी अवजड वाहने गगनबावडा पोलिसांनी गगनबावडा येथे थांबविणे आवश्यक होती.

परंतु, त्यांनी ती सर्व वाहने सोडून दिली. ही अवजड वाहने करूळ तपासणी नाक्यावर थांबविली. त्यानंतर ती सर्व वाहने रस्त्यालगतच उभी केली आहेत. गेले दोन दिवस गगनबावड्याकडून आलेली वाहने थांबविणे आणि त्यांची रस्त्यालगत पार्किंग करून ठेवणे यात वैभववाडी पोलिसांची (Vaibhavwadi Police) दमछाक झाली आहे. आतापर्यंत १०० हून अधिक अवजड वाहने वैभववाडी ते करूळ या मार्गावर उभी करण्यात आली आहेत. मात्र, आज पहाटे पुन्हा अवजड वाहने करूळ घाटरस्त्याने आल्यामुळे घाटात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली.

जवळपास दीड-दोन तास वाहतूक ठप्प होती. करूळ घाटात रस्त्यांच्या दुतर्फा दीडशे ते दोनशे वाहनांची रांग लागली होती. अनेक वाहनचालकांमध्ये गाडी बाजूला घेण्यावरून वाद होण्याचे प्रकार देखील झाले. तब्बल दोन ते अडीच तास वाहने घाटरस्त्यातच अडकली होती. अवघ्या दहा किलोमीटर घाटातील अंतर पार करण्यासाठी तीन तासाचा कालावधी लागल्यामुळे वाहनचालक अक्षरक्षः मेटाकुटीला आले होते.

मनस्ताप सहन करावा लागल्यामुळे वाहनचालकांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर टीका केली. वाहतूक कोंडीची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी गेले. त्यांनी घाटातील एक-एक वाहन मार्गस्थ करीत वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर घाटरस्त्यानजीक जी अवजड वाहने होती, ती देखील करूळ घाटरस्त्याच्या पुढे रस्त्यालगत आणून उभी करण्यात आली आहेत.

कोल्हापूरकडे जाणारी अवजड वाहने वैभववाडीत थांबविली होती. परंतु, गगनबावडा पोलिसांनी वाहने न थांबविल्यामुळे करूळ घाटात वाहतुकीची कोंडी झाली. मात्र, आता वाहतूक सुरळीत केली आहे. थांबविलेली वाहने आज रात्री दहा वाजल्यानंतर टप्प्याटप्प्याने मार्गस्थ करण्यात येतील. त्यानंतर वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होणार नाही.

- फुलचंद मेंगडे, पोलिस निरीक्षक, वैभववाडी

‘त्या’ पोलिसांवर कारवाईची मागणी

गगनबावडा येथे कायर्रत असलेल्या ज्या पोलिसांनी अवजड वाहने करूळ घाटमार्गे सोडली, त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा. त्यांच्या चुकीमुळे आम्हाला मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है' राहुल गांधींनी उघडली तिजोरी अन् निघाला अदानी-मोदींचा फोटो, Video Viral

Latest Maharashtra News Updates : नाशिकमधील रेडीसन ब्लू हॉटेलवर निवडणूक आयोगाची कारवाई

ऋषभ पंतसारखाच आणखी एका क्रिकेटपटूचा भीषण अपघात; गाडीचा झालाय चुराडा...

भावासाठी उदयनराजे मैदानात! 'झुकेगा नही साला' म्हणत, कॉलर उडवत शिवेंद्रराजेंना मताधिक्‍याने विजयी करण्याचं केलं आवाहन

Nawab Malik : मतदानाच्या एक दिवस आधीच नवाब मलिक यांचे 'एक्स' अकाऊंट हॅक

SCROLL FOR NEXT